Sharad Pawar Vs Ajit Pawar : मुख्यमंत्र्यांवरील टिपण्णीवरून पवारांकडून अजितदादांची कोंडी ; म्हणाले "आता 'असल्या'..."

Sharad Pawar Attack On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही मेळाव्यांतून ऐकमेकांवर घणाघात
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra NCP Crisis : राज्यात रविवारी (ता. २) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांनी इतर आठ जणांसह राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले. भाजपसोबत गेल्याने अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. (Latest Political News)

राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर दोन्ही गटाचे आज बुधवारी (ता. ५) मुंबईत मेळावे पार पडले. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राजकारण करण्याच्या पद्धतीवर जोरदार टीका केली. विकासाचा मुद्द्यावरून आपण भाजपमध्ये सहभागी झाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. हाच धागा पकडून शरद पवारांनी अजित पवारांचा समाचार घेतला. यासाठी अजितदादांनी केलेल्या दहा दिवसांपूर्वीच्या एका भाषणाचा दाखला दिला.

Sharad Pawar, Ajit Pawar
Mohan Bhagwat In Pune: सरसंघचालक मोहन भागवत शहरात अन् सामाजिक कार्यकर्ते भापकर पोलिसांच्या नजरकैदेत

शरद पवार म्हणाले, "राज्याच्या ऐक्याला सुरूंग लावण्याची भाषा भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. आज आपल्या पक्षातील काही नेते त्यांच्याबरोबर गेले आहेत. त्यामुळे मनात अस्वस्थता आहे. मागील काही दिवसांपूर्वीचे त्यांचे भाषण ऐकले. त्यात त्यांनी म्हटले होते की राज्याच्या इतिहासात 'असला' मुख्यमंत्री झाला नाही. आता ते 'असल्या' मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काम करणार आहेत."

Sharad Pawar, Ajit Pawar
NCP Saroj Ahire News: सरोज अहिरे यांचे दोन्ही डगरीवर हात!

छगन भुजबळ यांनी पवारांना पांडुरंग म्हटले होते. तर जयंत पाटील यांना बडवे म्हणत टीका केली होती. यावर पवारांनी छगन भुजबळ यांचाही समाचार घेतला. पवार म्हणाले, "पक्षात फूट पडत असल्याचे छगन भुजबळ यांना समजले. त्यांना मला सांगितले की तिकडे काय चालले आहे ते पाहून येतो. भुजबळ तिकडे गेले आणि त्यांनीच शपथ घेतली. अशा फुटीर वृत्तीवर बोलणे योग्य नाही. फुटीरांबाबत माझी काहीही तक्रार नाही."

Edited by Sunil Dhumal

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com