NCP Crisis And Rohit Pawar : राष्ट्रवादी फुटीनंतर बारामतीतून कोण जिंकणार? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Baramati Loksabha And Vidhansabha : बारामती लोकसभा अन् विधानसभेबाबत सूज्ञ जनता योग्य निर्णय घेईन
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP Crisis And Baramati : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाला. अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथही घेतली आहे. अजितदादांनी उचललेल्या या पवालामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक कार्यकर्ते भावनीक झाले आहे. शरद पावर की अजित पवार कुठल्या गटात जावे याबाबत त्यांच्यात संभ्रमाचे वातावरण आहे. या कोलाहालात बारामतीकरांची भावनीक कोंडी झाल्याचे बोलले जात आहे. (Latest Political News)

फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार आणि शरद पवार दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शरद पवार यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीर राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. पवार यांनी बंडखोर माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पहिला घाव घातला आहे. इतर बंडखोरांचाही ते समाचार घेणार आहे. अशा वातावरणात बारामतीकर कुणाला साथ देणार याबाबत आमदार रोहित पवार यांनी स्पष्टच सांगितले आहे.

Rohit Pawar
Uddhav Thackeray On BJP : भाजप राजकारणातील नामर्द; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रोहित पवार प्रसार माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर रोहित पवार यांना छेडले. यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्पष्टपणे उत्तर दिले. रोहित पवार म्हणाले, "बारामती लोकसभेतून सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार असा कुठलाही सामना रंगणार नाही. बारातमी लोकसभेच्या जागेबाबत बारामातीची सूज्ञ जनता योग्य निर्णय घेईन."

यावेळी त्यांनी बारामती विधानसभेबाबतही मोठे वक्तव्य केले. रोहित पवार म्हणाले, "बारामती विधानसभेच्या जागेबाबबत रोहित पवार म्हणाले, बारामतीच्या विधानसभेमध्ये फक्त आणि फक्त अजितदादाच जिंकू शकतात. बाकी कुणीही येथून जिंकू शकत नाही." बारामतीमधून विधानसभेला पवार कुटुंबातील कुणीही लढणार नाही, असेही पवार यांनी सांगितले.

Rohit Pawar
Murlidhar Mohol slams Rohit Pawar : रोहितदादा, घरात भांडणे का लागली ? याचं उत्तर शोधा ; मोहोळांचा टोला, शिल्लक पार्टी..

रोहित पवार म्हणाले, "मला उमेदवारी दिली तरी मी बारामतीतून लढणार नाही. पवार कुटुंबातील इतर कुणीही येथून लढणार नाही. अजितदादांच्या निर्णयावर बारामतीकर नाराज आहेत. मात्र बारामती विधानसभेचा विषय येईल त्यावेळी बारामतीचे नागरिक अजितदादांनाच मतदान करतील. अजितदादांनी केलेल्या कामांमुळे तेच तेथून निवडून येणार, असा मलाही विश्वास वाटतो."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com