'मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो, शिंदे साहेब वाईट वाटले!'

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या फोटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) केंद्र सरकारवर टीका
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Amol Mitkari : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले आहेत. निती आयोगाच्या बैठकीनंतर झालेल्या फोटो सेशन वरुन राज्यात मोठे रणकंद झाले आहे. या फोटो सेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Eknath Shinde
देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपद स्वतःकडेच ठेवणार?

या फोटोमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेवटच्या रांगेमध्ये उभे असलेले दिसत आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर महाराष्ट्राचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. या फोटोमध्ये पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मध्यप्रदेचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदी आहेत. मात्र, एकनाथ शिंदे हे सर्वात मागे उभे आहेत. त्यावरुन आता जोरदार टीका होत आहे.

या संदर्भात अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्वीट करत म्हटले आहे "दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा" हा इतिहास ज्या महाराष्ट्राचा त्याचे स्थान शेवटच्या रांगेत आणि शिवप्रभुंचा स्वाभिमान जेथे उफाळुन आला तो आग्रा दरबार (उ.प्र.) पहिल्या रांगेत? प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो, शिंदे साहेब वाईट वाटले'' असा टोला त्यांनी लगावला आहे.

तर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही या फोटोवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. रोहित पवार ट्वीट करत म्हणाले, ''एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणे योग्य नाही. प्रत्येक #मराठी मनाला यामुळे नक्कीच दुःख झालय. यापुढे असे होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com