Devendra Fadnavis : मुंबई : राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार अनेक दिवसांपासून रखडला आहे. सरकार स्थापन होऊन तब्बल 37 दिवस झाले आहेत. तरी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरत नाही आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीमध्ये आहेत. मंत्रीमंडळ विस्तार या आठवड्यात होणार असून फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे.
या दौऱ्यात विस्ताराबाबत निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचीही मंत्रीमंडळात वर्णी लागणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्विकारावे लागल्यामुळे भाजपचा एक गट नाराज आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारात महत्त्वाची खाती भाजपकडे राहणार आहेत. त्यामध्ये फडणवीसांकडे गृहमंत्रीपद राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पुन्हा एकदा दिल्लीमध्ये सांगितले आहे. तसेच रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवारांना देखील फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे त्यांना आता बोलावेच लागते. त्यामुळे त्यांना हे आठवावे लागेल की त्यांचा काळातही 30 ते 32 दिवस पाचच मंत्री होते, असे फडणवीस म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.