Ajit Pawar On Sanjay Raut : आमच्या पक्षाचे वकीलपत्र घेऊ नका; अजित पवारांनी संजय राऊतांना सुनावलं

Ajit Pawar Press Conference : अजित पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असतानाच आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असतानाच आज अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना शिंदे-फडणवीस सरकारवर कडाडून टीका केली. तसेच यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांनाही सुनावलं आहे.

अजित पवार म्हणाले, ''कारण नसताना माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. अशा बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. माझ्या बद्दल एवढं काय प्रेम उथू चाललं आहे. 40 आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. आम्ही राष्ट्रवादीत राहणार आहोत. इतर राजकीय पक्षाचे नेते याबाबत बोलत आहेत. मात्र मी त्याबाबत बोलणार नाही'', असं ते म्हणाले आहेत.

Ajit Pawar
Ajit Pawar On Rumours: ...तोपर्यंत राष्ट्रवादी सोडणार नाही; अजितदादांकडून भाजप प्रवेशाच्या चर्चांवर पडदा

आमदारांच्या भेटीबाबतही त्यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, ''प्रत्येक मंगळवारी आमदार मला भेटतात, हे नेहमीचे आहे. अनेक आमदारांचं काम होतं म्हणून आले होते, त्याचा वेगळा अर्थ काढू नका'', असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

Ajit Pawar
Nana Patole News : काँग्रेस देशभरात ‘नरेंद्र मोदी जवाब दो’ आंदोलन करणार! नाना पटोलेंची पुण्यात मोठी घोषणा

तसेच अजित पवार हे भाजपसोबत जाण्याच्या वावड्या असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. या मुद्द्यावर बोलताना अजित पवार यांनी संजय राऊत यांना चांगलच सुनावलं आहे. ते म्हणाले की, ''त्यांनी (संजय राऊत) आमच्या पक्षाचे वकीलपत्र घेऊ नका'', असं म्हणत संजय राऊतांना नाव न घेता टोला लगावला आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar On Sanjay Raut : तुमच्या पक्षाचं बघा; आमच्याबद्दल का बोलता? अजितदादांनी राऊतांना सुनावलं !

अजित पवार म्हणाले, ''काही-काही तर पक्षाच्या बाहेरचे प्रवक्ते हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यासारखे बोलतात. त्यांना कुणी अधिकार दिला कुणाला माहीत. ज्यावेळी पक्षाची मिटींग होईल त्यावेळी मी याबाबत विचारणार आहे. तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात त्या पक्षाबद्दल सांगा ना काय सांगायचं ते.ज्या पक्षाच मुखपत्र आहे, तुम्ही त्याबाबत बोला. पण तुम्ही आम्हाला कोट करून हे असं झालं ते तसं झालं कशाला बोलता?. आम्ही भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकील पत्र दुसरं कोणी घेण्याचे काही कारण नाही'',अशा शब्दात अजित पवारांनी नाव न घेता संजय राऊतांना सुनावलं आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com