Ajit Pawar On Shinde Government: महापुरुषांचे पुतळे का हटवले; अजितदादांचा शिंदे सरकारला सवाल

Ajit Pawar On Maharashtra Sadan Statues : महाराष्ट्र सदन निर्माण करत असताना छगन भुजबळ यांनी खूप मोठं योगदान दिलं आहे.
Devendra Fadanvis, Ajit Pawar and Eknath Shinde
Devendra Fadanvis, Ajit Pawar and Eknath ShindeSarkarnama

Ajit Pawar on Maharashtra Sadan Statues : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीदिवशी महाराष्ट्र सदनात कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमांच्या निमित्ताने येथील काही पुतळे हटविण्यात आले, यावरुन विरोधकांनी शिंदे सरकारला जाब विचारला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी प्रशासनाचे सुनावलं आहे.

दिल्लीत महाराष्ट्र सदन निर्माण करत असताना छगन भुजबळ यांनी खूप मोठं योगदान दिलं आहे. अनेक मान्यवरांचे पुतळे त्याठिकाणी आहेत. योग्य जागा निवडून ते पुतळे आपण तिथे बसवले आहेत. महाराष्ट्र सदनात महापुरुषांचा आदर्श कायम डोळ्यासमोर राहण्यासाठी त्यांचे पुतळे येथे बसविण्यात आले होते.

ते आपल्या देशाचे आणि महाराष्ट्राचे दैवत आहेत. परंतु काही महापुरुषांचे पुतळे हटवण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र सदनाकडून अविश्वासार्ह वक्तव्यं करण्यात आलं. त्यामागील आमचा हेतू वेगळा होता. असं महाराष्ट्र सदनाकडून सांगण्यात आलं. मग पुतळा कशाला हलवला?, असा सवाल अजित पवारांनी बुधवारी उपस्थित केला. ते माध्यमांशी बोलत होते.

Devendra Fadanvis, Ajit Pawar and Eknath Shinde
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर ; सावित्रीबाई फुले बदनामी प्रकरणी पोलीस..

मास्टरमाइंड कोण ?

अजित पवार म्हणाले, ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ या दोन वेबसाईटवर इतकं खालच्या पद्धतीनं लिखाण करण्यात आलंय की, मी तुम्हाला येथे सांगूही शकत नाही. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या आमच्या प्रेरणास्त्रोत आहोत. आम्ही अनेक महापुरुषांची नाव घेत असतो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवीन पिढीने काम करावं. असं आमचं सातत्यानं म्हणणं असतं. त्यासाठी आम्ही सीपींसोबत बोललो आणि त्यांनी या प्रकरणाची दखलही घेतली. अशा प्रकारचं लिखाण करण्यामागे मास्टरमाइंड कोण?, हे लिखाण करण्यासाठी कोणी प्रवृत्त केलं. हे शोधून काढण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली,"

Devendra Fadanvis, Ajit Pawar and Eknath Shinde
Sanjay Shirsat : विनयभंग प्रकरणी शिवसेना आमदाराला क्लीन चीट ; सुषमा अंधारेंनी...

"सत्तेत असणाऱ्या प्रवक्त्यांनी देखील त्यामध्ये भर घातली. हे जे काही सुरू आहे. त्याविरोधीत मविआनं मोर्चा देखील काढला होता. बेरोजगारीचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या समस्या या प्रश्नाला महत्त्व देण्याऐवजी हे प्रश्न पुढे आले. त्यामुळे महापुरुषांबद्दल कुणीही आणि वाचाळविरांनी बोलू नये. बेताल वक्तव्य करणाऱ्यांना शासन झालं पाहिजे," अजित पवार म्हणाले.

महापुरुषांचा अपमान बहुतेक ठिकाणी राज्यकर्त्यांकडूनच केला जातोय. कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे. राजकीय हस्तक्षेप होऊ न देणं हे त्यांचं काम आहे. पूर्वींच्या राज्यपालांनी ही सुरूवात केली. त्यानंतर आताच्या कॅबिनेट मंत्र्यांनी त्यामध्ये भर घातली, असे अजित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com