NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर ; सावित्रीबाई फुले बदनामी प्रकरणी पोलीस..

NCP demands action against Indic tales : अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील उपस्थित होते.
NCP demands action against Indic tales
NCP demands action against Indic tales Sarkarnama

NCP demands action against Indic tales : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 'इंडिक टेल्स' या वेबसाइटनं आक्षेपार्ह लिखाण केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसनं तीव्र निषेध केला आहे.

या वेबसाइटवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर निदर्शनं केली.(ncp leaders aggressive on defamation of savitribai phule again in mumbai)

या आंदोलनात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले यांच्या अवमान प्रकरणी ‘इंडिक टेल्स’ (Indic Tales) या वेबसाईट विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेच्यावतीने मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर निदर्शनं करण्यात आली. पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

NCP demands action against Indic tales
Ahilyadevi Holkar Jayanti : अहिल्यादेवी होळकर जयंतीवरुन रोहित पवार-राम शिंदे आमने सामने ; पवारांनी मध्यरात्रीच..

"इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर आणि संबंधितावर कठोर कारवाई करण्याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांना राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी निवेदन दिले. 'इंडिक टेल्स' वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

NCP demands action against Indic tales
Sanjay Shirsat : विनयभंग प्रकरणी शिवसेना आमदाराला क्लीन चीट ; सुषमा अंधारेंनी...

काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील महापुरुषांची बदनामी करण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी सावित्रीबाई फुले (Savitribai Phule ) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली होती. आता पुन्हा सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त लिखाण करण्यात आले आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com