Hasan Mushrif News: नॉटरिचेबल असलेले मुश्रीफ कागलमध्ये प्रकटले ; म्हणाले, "ज्या प्रकरणाशी माझा संबंध नाही, त्याचे समन्स.."

Corruption Case: "ज्या प्रकरणाशी माझा संबंध नाही, त्याचे समन्स ईडी पाठवलं आहे,"
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama

NCP News : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना ईडीने समन्स बजावले आहे, ते आज ईडीच्या चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. शनिवारी ईडीनं मुश्रीफांच्या कागल येथील घरावर छापेमारी केली आहे. त्यानंतर मुश्रीफ हे नॅाटरिचेबल होते, त्यानंतर ते आज (सोमवारी) थेट कागल येथील आपल्या घरी आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हसन मुश्रीफ म्हणाले, "मी अर्थंसंकल्पीय अधिवेशनात होतो. आज कागलला कुटुंबियांना भेटण्यासाठी आलो आहे. आजच्या ईडीच्या चौकशीसाठी मी उपस्थित राहू शकणार नाही, माझे वकील ईडीकडून मुदत मागणार आहेत," "ज्या प्रकरणाशी माझा संबंध नाही, त्याचे समन्स ईडी पाठवलं आहे,"

Hasan Mushrif
UP civic polls 2023 AAP : मोफत वीजेनंतर आता AAP ची नवी स्लोगन ; 'घरपट्टी ५० टक्के माफ-नळपट्टी माफ'..

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सभासदांवरून झालेल्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांना ईडीने समन्स बजावले आहे. त्यांना आज (सोमवारी) ईडी कार्यालयात हजर राहण्याचा आदेश बजावला आहे.

हसन मुश्रीफ आमदार आहेत. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ ईडीसमोर हजर राहणार की, हजर राहण्यासाठी मुदत घेणार याकडे लक्ष लागले आहे. हसन मुश्रीफ यांचे वकील ईडी कार्यालयात त्यांची बाजू मांडणार आहे.

Hasan Mushrif
Abdul Sattar News : कृषीमंत्र्याच्या जिल्ह्यात सातवी तर मतदारसंघात चौथ्या शेतकऱ्याची आत्महत्या..

11 जानेवारीच्या छाप्यानंतर हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयासह घोरपडे कारखान्याशी संबंधित दोन शाखांवर ईडीने छापे टाकले होते.

बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह अन्य अधिकार्‍यांना चौकशीसाठी मुंबईला नेले होते. बँकेतून घोरपडे कारखान्याशी संबंधित काही कागदपत्रे ताब्यात घेतली होतीत. त्याचप्रमाणे साखर कारखान्यांना दिल्या जाणार्‍या कर्जाची कागदपत्रे असलेली बँकेतील खोली ईडीने सील केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com