UP Civic Polls: मोफत वीजेनंतर आता AAP ची नवी स्लोगन ; 'घरपट्टी ५० टक्के माफ - नळपट्टी माफ'..

UP Civic Polls 2023 AAP News Update: उत्तरप्रदेशातील ६३३ नगरपालिका जागांसाठीच्या प्रभारींची नावांची केली आहे.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Sarkarnama

AAP News: उत्तरप्रदेशातील स्थानिक निवडणुकासाठी आम आदमी पार्टीने जोरदार तयारी केली आहे. ही निवडणुक जिंकण्यासाठी विविध आश्वासने आपने मतदारांनी दिली आहेत.

नगरपालिका निवडणुकीत 'आप'ला बहुमत मिळाले तर 'घरपट्टी ५० टक्के माफ-नळपट्टी माफ'करण्याचे मोठे आश्वासन पक्षाने मतदारांना दिले आहे. आम आदमी पक्षाचे खासदार आणि उत्तरप्रदेशाचे प्रभारी संजय सिंह यांनी हे आश्वासन दिले आहे. 'घरपट्टी ५० टक्के माफ-नळपट्टी माफ'हे पक्षाचे नवे घोषवाक्य संजय सिंह यांनी नुकतेच प्रदर्शित केले आहेत.

"उत्तरप्रदेशात नगरपालिका निवडणुकीत आम्हाला विजय मिळाला तर आम्ही 'घरपट्टी ५० टक्के माफ-नळपट्टी माफ'करणार आहोत," असे संजय सिंह यांनी एका कार्यक्रमात सांगितले. संजय सिंह यांनी यावेळी मोदी सरकारवर टीका केली.

Arvind Kejriwal
ED समोर हजर राहणार की नाही..; हसन मुश्रीफांकडून..

उत्तरप्रदेशातील ६३३ नगरपालिका जागांसाठीच्या प्रभारींची नावांची घोषणा संजय सिंह यांनी केली आहे. आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मतदारांशी संपर्क साधणार आहेत. स्वच्छ शहर, आरोग्यसुविधा, दर्जेदार शिक्षण यासाठी मते मागणार आहेत. पंजाब सरकारचे दिल्ली माँडेलवर काम सुरु आहे. २०२२ मध्ये उत्तर प्रदेशात आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणूक लढवली होती, पण त्यांना एकही जागा मिळाली नव्हती.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दररोज विरोधीपक्षांवर निशाणा साधत आहेत, केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करीत आहेत. सीबीआयने पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या विरोधात ३० तर बिहारमध्ये २६ प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत,' असे संजय सिंह यांनी सांगितले.

Arvind Kejriwal
Congress : काँग्रेसला मोठा धक्का ; माजी मुख्यमंत्र्याचा राजीनामा ; भाजपच्या वाटेवर..

मागासवर्गीय आयोगाने आरक्षणाबाबतचा आपला अहवाल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सुपूर्त केला आहे.साडेतीनशे पानांच्या या अहवालाकडे राज्याचे लक्ष आहे. राज्य सरकार हा अहवाल सुप्रीम कोर्टात दाखल करणार आहे. कोर्टाच्या सुनावणीच्या आधीच राज्य सरकार याबाबत विशेष अपील करण्याच्या तयारीत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com