नवाब मलिक यांच्या कन्येचे ते पत्र व्हायरल.. माझ्या पतीकडे गांजा नव्हताच!

नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर समीर खान (Nilopher Sameer Khan) यांचा एनसीबीच्या कारवाईवर सवाल
Nilopher Malik Khan
Nilopher Malik KhanSarkarnama

मुंबई : मुंबईत अमली पदार्थ बाळगणाऱ्यांविरोधात एनसीबीच्या (NCB) कारवाया आणि काही अधिकाऱ्यांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक-खान (Nilopher Malik Khan) हिने सोशल मीडियावर लिहिलेल्या खुल्या पत्राची शनिवारी चर्चा होती.

निलोफर हिचे पती समीर खान (Sameer Khan) यांना एनसीबीने अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जानेवारीत अटक केली होती. सप्टेंबर महिन्यात त्यांची जामिनावर सुटका झाली. जामीन देताना कोर्टाने खान यांच्याकडे सापडलेला पदार्थ हा गांजा नसून हर्बल तंबाखू असल्याचे निरिक्षण नोंदवले होते. त्या पार्श्वभूमीवर पतीच्या अटकेनंतर निलोफर यांनी त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचा भावनीक तपशील या पत्रातून मांडला आहे.

Nilopher Malik Khan
माझी बदली झाली नसून मी मुंबई एनसीबीच्या झोनल डायरेक्टर पदावर कायम : समीर वानखेडे

जानेवारीत एनसीबीने समीर खान यांना अटक केली. त्यानंतर आमच्या घराची झडती घेण्यात आली. त्यात एनसीबीच्या अधिकाऱ्यांना काहीही सापडले नाही. तरीही खान यांना साडे आठ महिने तुरुंगात घालवावे लागले. या दरम्यान आपण प्रचंड मानसिक तणावातून गेल्याचं निलोफर यांनी पत्रातून मांडलं आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी खान यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावले. परंतु तिथं प्रसार माध्यमांचे फोटोग्राफर आणि कॅमेरामन आधीपासून कसे उपस्थित होते, असा सवाल त्यांनी पत्रातून उपस्थित केला आहे. सलग १५ तास चौकशीनंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या पतीला अटक केली. मात्र अटकेचे कारण स्पष्ट केले नव्हते. तो काळ माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी अत्यंत तणावाचा होता. आमची जी अवस्था झालेली ती शब्दात मांडणे कठीण आहे, असं निलोफर यांनी पत्रात लिहिले आहे.

Nilopher Malik Khan
समीर वानखेडेंना दणका : आर्यन खान प्रकरणाचा तपास एनसीबीने काढून घेतला!

आमची बाजू जाणून न घेता अनेकांनी आम्हाला गुन्हेगार घोषित केले. या दरम्यान माझ्या दोन लहान मुलांनाही एका विचित्र अशा परिस्थितीतून जावे लागले. त्यांचे मित्र त्यांच्याशी बोलत नव्हते. लोक आमच्याशी बोलायला सुद्धा घाबरत असत. काहीजण तर मला ‘ड्रग पेडलरची पत्नी’ म्हणूनही हिणवत होते.

एनसीबीने समीर वानखेडे यांच्याकडून काही प्रकरणांचा तपास काढून घेतल्यानंतर निलोफर मलिक-खान यांनी एक ट्विट केलं होतं. 'जनतेला गृहीत धरले जाऊ नये. जे अपराधी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि इतर लोकांना आवाहन करते की त्यांनी पुढे यावं आणि आमच्याबरोबर अन्यायाविरुद्ध लढा द्यावा' असं ट्विट त्यांनी केलं होतं. आता त्यांनी थेट सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्यामुळे यावर आता विविध प्रतिक्रियाही समोर येत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com