Sudhir Mungantiwar: पवार 30 वर्षांनी 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला; मुनगंटीवार म्हणतात, 'सुप्रिया सुळे मुख्यमंत्री...'

Sharad Pawar Darshan Of Lalbaug Raja : नवसाला पावणारा अशी ख्याती असल्यामुळे सेलिब्रेटींसह राजकीय नेत्यांची लालबागच्या दर्शनासाठी मोठी लगबग पाहायला मिळत आहे. त्यातच सोमवारी (ता.9) लालबाग राजाच्या चरणी लीन होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी हजेरी लावली.
Sudhir Mungantiwar on Sharad Pawar Lalbaug Raja Darshan .jpg
Sudhir Mungantiwar on Sharad Pawar Lalbaug Raja Darshan .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: देशभरात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे.त्यात मुंबईतील लालबागचा राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी प्रचंड गर्दी होते. त्यात नवसाला पावणारा अशी ख्याती असल्यामुळे सेलिब्रेटींसह राजकीय नेत्यांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. त्यातच सोमवारी (ता.9) लालबाग राजाच्या चरणी लीन होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी हजेरी लावली.

लालबाग राजाच्या दर्शनाला थोरल्या पवारांसोबत नात रेवती सुळे आणि जावई सदानंद सुळे देखील उपस्थित होते. याच त्यांच्या दर्शनावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यातच मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनीदेखील टायमिंग साधत लालबागच्या दर्शनासाठी गेलेल्या पवारांवर मिश्किल टिप्पणी केली. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री व्हाव्या म्हणून इच्छा व्यक्त केली असावी असं मुनगंटीवार म्हणाले.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, महायुतीतील जागावाटप,अजित पवारांची नाराजी यांसारख्या विविध मुद्द्यांवर थेट भाष्य केले. याचवेळी त्यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) लालबागच्या राजाच्या दर्शनावरही आपली भूमिका मांडली.

मुनगंटीवार म्हणाले, सुप्रिया सुळे मुख्यमंत्री व्हाव्या म्हणून इच्छा व्यक्त केली असावी असं मुनगंटीवार म्हणाले. यंदा व पुढील काही वर्षे त्यांच्या मनातील मुख्यमंत्री होणार नाही. विरोधी पक्षनेता मात्र नक्की होईल असा चिमटा मुनगंटीवारांनी काढला. याआधी मुख्यमंत्री असताना शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर आता तब्बल 30 वर्षांनंतर आता पवारांनी राजाचं दर्शन घेतले.

Sudhir Mungantiwar on Sharad Pawar Lalbaug Raja Darshan .jpg
Bhagyshri Ataram News : भाग्यश्री आत्राम यांचं ठरलं! वडिलांविरोधात मुलगी मैदानात, 'या' तारखेला करणार शरद पवारांच्या 'NCP'त प्रवेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विविध नेतेमंडळींनी यापूर्वी लालबागच्या राजाचं दर्शन घेतले होते. मुनगंटीवार म्हणाले, प्रत्येकाला गणेशाचे दर्शन घेण्याचा अधिकार आहे.गणराया तू मला सद्बुद्धी दे एवढी प्रार्थना मी करेल.देव, देश धर्मासाठी मागचे सारे विसरायचे असते. त्यांची तुलना करायची नसते. पवारांनी लोक माझे सांगातीमध्ये त्यांनी मान्य केले आहे. ते धार्मिक नाहीत. भीमाशंकर दर्शन मनात नव्हते पण आग्रहाने गेले. हा श्रद्धेचा विषय आहे. आज जेव्हा ते देवासाठी गेले असेही भाजप नेते मुनगंटीवार यांनी सांगितले.

कोअर कमिटीमध्ये जी चर्चा होते, ती पक्ष अंतर्गत कारभार सूचना असते.जनता चर्चा नसते.पण सूत्र एक आहे. भाजप किती जागा लढवणार? भाजप शिवसेना व राष्ट्रवादी असा फरक करु नका. सर्व जागा महायुती लढेल व विजयी होईल.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व घटकांचा विकास करण्याचा संकल्प आहे.महाविकास आघाडी सरकारचा एकच डायलॉग आहे.केंद्रावर टीका करायची,त्यांचे सरकार म्हणजे विकासाला ग्रहण लागेल. प्रगतीला ग्रहण लागेल. फक्त केंद्रावर टीका करण्यात ते धन्यता मानतील असा टोलाही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.

Sudhir Mungantiwar on Sharad Pawar Lalbaug Raja Darshan .jpg
NCP Ajit Pawar : 'NCP'मध्ये भूकंपाचे संकेत? पक्ष नेतृत्वाला डावलून अजितदादांच्या 10 जिल्हाध्यक्षांची तातडीची बैठक

मुनगंटीवार म्हणाले, काँग्रेसमुळे जनता मागे राहिली.रस्ता झाला नाही,असे ते जेव्हा बोलतात,तेव्हा त्यांनी का नाही केले याच उत्तर द्यावे.महाराष्ट्रात आम्ही साडेसात वर्षे आहोत. तरीही इतके किमी रस्ते केले. तुम्ही 60 वर्षांत केले नाही. तुम्ही हा आव आणता की, राज्य आम्ही चालवतो. पण तुम्ही राजकारण चालवता.विकासाचे नाही तर सत्तेचे राजकारण करता.अशी काही चर्चा झाली नाही.

मी सहमत आहे. महायुतीने गंगा, यमुना संगमप्रमाणे एकत्रित पुढे जायचे आहे. प्रत्येक पक्षाने महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करावे लागेल. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी महायुती जिंकेल असा भाव असला पाहिजे. कोण कोणत्या पक्षाचा आहे हे बघू नका असेही ते म्हणाले.

आमच्यासाठी भाजप पक्ष नाही तर...

महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावर मुनगंटीवार म्हणाले. मी नाही म्हणून मी सोबत नाही असे करु नका. त्यांची तब्येत बरी नाही. म्हणून ते आले नसतील. अजित पवार यांना आम्ही दुसऱ्या पक्षाचे नेते मानत नाही. रामायणात बिभीषण रामासोबत आले. तेव्हा ते त्यांचे झाले. आमच्यासाठी भाजप पक्ष नाही तर एक परिवार आहे. एखाद्या दौऱ्यात ते नसतील तर त्यांच्याबाबत मत बनवण्याचे कारण काय? असंही मुनगंटीवार म्हणाले.

शरद पवार मराठा आरक्षणाबाबत मत व्यक्त करतील,तेव्हा बघू. तुम्हाला आम्हाला पाडून काय आनंद होतोय. प्रश्न सुटेल का ? पुन्हा हे बोलतील की केंद्र करत नाही अशी टीकाही ते परत करतील.

नवीन भविष्यकार कोण आहे.बारामतीच्या जनतेने काय ते ठरवावे. इतरांनी व जनतेतून निवडून न जाणा लोकांनी तरी ते ठरवू नये.एक मसुदा तयार केला आहे.विनय सहस्रबुद्धे यांनी केले आहे.कॅबिनेट मंजुरी घ्यायची असेल तर 17 विभागात ते पाठवावे लागेलच. पुढील 15 दिवसांचं धोरणाची मान्यता घ्यायची आहे.लगेच त्यांची अंमलबजावणी करायची आहे असंही भाजप नेते मुनगंटीवार यांनी सांगितले.

Sudhir Mungantiwar on Sharad Pawar Lalbaug Raja Darshan .jpg
Supriya Sule : सरकारचा वेग 'गोगलगायी' एवढा? कोणत्या उपमुख्यमंत्र्यांची कबुली; सुप्रिया सुळेंनी टायमिंग साधलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com