NCP News : शरद पवार गटाचा 'लाव रे तो व्हिडीओ'चा प्रयोग, अजित पवार गटाची पोलखोल

NCP MLA Disqualification Hearing : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात अजित पवार गटाची कोंडी...
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

NCP MLA Disqualification Case News :

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांच्या साक्ष पूर्ण झाल्या आहेत. शरद पवार गटाचे वकील शरण जेठीयानी यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करताना त्यांनी सोशल मीडियाचा पुरेपूर उपयोग करत 'लाव रे तो व्हिडीओ'चा वापर केला.

कोर्टात लाव रे तो व्हिडीओ

राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढ्यात पार पडत आहे. सर्वात आधी शरद पवार गटाकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि हेमंत टकले यांची उलटतपासणी पार पडली. त्यानंतर अजित पवार गटाकडून सुनील तटकरे आणि अनिल पाटील यांची उलटतपासणी पार पडली.

ज्यावेळी अजित पवार गटाच्या नेत्यांची उलटतपासणी सुरू होती, त्यावेळी शरद पवार गटाकडून सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला गेला. शरद पवार गटाकडून सुनील तटकरे आणि अनिल पाटील यांचे व्हिडीओ दाखवण्यात आले. Sharad Pawar यांना अध्यक्षपदाचा राजीनामा न देण्याची मागणी ते व्हिडीओत करताना दिसत आहेत.

Sharad Pawar, Ajit Pawar
NCP Hearing : शरद पवारांकडून दुसऱ्या चिन्हाची चाचपणी? राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीवरून चर्चेला उधाण!

शरद पवार यांनी ज्यावेळी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यावेळी राष्ट्रवादीतील सर्वच नेत्यांनी त्यांना राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्याची गळ घातली होती. यामध्ये सुनील तटकरे आणि अनिल पाटील यांचे व्हिडीओ दाखवण्यात आले.

साहेबांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये, असे ते माध्यमांशी संवाद साधताना बोलले होते. हेच लोक आहेत जे आता त्यांचं पद मान्य करीत नाहीत, हे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा उपयोग करीत अजित पवार गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून केला गेला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचं रहस्य काय?

पहाटेच्या शपथविधीमागचं रहस्य जाणण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं आणि कोणा-कोणाला याची कल्पना होती? हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. खासदार सुनील तटकरे यांनी आपली साक्ष नोंदवताना याप्रकरणी माहिती दिली.

या सुनावणीदरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, खासदार सुनील तटकरे यांची उलटतपासणी घेण्यात आली. अजित पवार यांनी 2019 मध्ये जी शपथ घेण्यात आली होती ती पक्षनेतृत्वाच्या म्हणजेच शरद पवार यांच्या सहमतीनेच घेतली होती, असा दावा यावेळी सुनील तटकरे यांनी केला.

अजित पवार यांनी पहाटे घेतलेला शपथविधी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडींपैकी एक आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांची उलटतपासणी घेण्यात आली. यावेळी सुनील तटकरे यांनी हा दावा केला आहे.

edited by sachin fulpagare

R...

Sharad Pawar, Ajit Pawar
NCP News : अजित पवार गटाच्या वरिष्ठांकडून नेत्यांना मीडियासमोर अधिक न बोलण्याची ताकीद?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com