NCP Hearing : शरद पवारांकडून दुसऱ्या चिन्हाची चाचपणी? राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीवरून चर्चेला उधाण!

Sharad Pawar and Ajit Pawar News : सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा निकाल 15 फेब्रुवारीपर्यंत द्या, असे निर्देश राहुल नार्वेकरांना दिले आहेत.
Sharad Pawar and Ajit Pawar
Sharad Pawar and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू असून, राष्ट्रवादी कोणाची याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही पक्षांची सुनावणी सुरू आहे, तर शिवसेनेचा जसा निकाल लागला तसाच काहीसा निकाल राष्ट्रवादीच्याबाबतीतही लागेल, अशाही चर्चा सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कोणाची, हा निकाल लागण्याअगोदरच शरद पवारांकडून दुसऱ्या चिन्हाची चाचपणी सुरू असल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रवादीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. त्यानंतर दोन्ही नेत्यांकडून राष्ट्रवादी आमची हा दावा करण्यात आला, तर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार राष्ट्रवादी कोणाची, याचा निर्णय होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar and Ajit Pawar
NCP News : अजित पवार गटाच्या वरिष्ठांकडून नेत्यांना मीडियासमोर अधिक न बोलण्याची ताकीद?

शिवसेनेच्याबाबतीत जो निकाल लागला तो ऐतिहासिक आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे, असा निर्णय अध्यक्षांनी दिला. तसाच निर्णय राष्ट्रवादीच्याबाबतीत लागेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. राष्ट्रवादी कोणाची हा निर्णय राहुल नार्वेकर अजित पवारांच्या (Ajit Pawar) बाजूने लावणार आहेत, असे राजकीय भाकीत केले जात आहे. त्यामुळे शरद पवारांनी दुसऱ्या चिन्हाबाबत चाचपणी सुरू केल्याचं म्हटलं जात आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणात काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा निकाल 15 फेब्रुवारीपर्यंत द्या, असे निर्देश राहुल नार्वेकरांना दिले आहेत.

तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याचिकेसंदर्भात आजची सुनावणी पूर्ण झाली असून, आम्ही दोन्ही बाजूचा ईव्हिडन्स क्लोज केलेला आहे. आता अंतिम सुनावणी होईल आणि 31 तारखेला हे प्रकरण क्लोज होईल. मला खात्री आहे 15 फेब्रुवारीच्या आत अंतिम निर्णय जारी केला जाईल,' अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Sharad Pawar and Ajit Pawar
NCP Hearing : राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? 15 फेब्रुवारीपर्यंत लागणार निकाल; नार्वेकरांची माहिती

शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे, असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिला. या निर्णयामुळे राहुल नार्वेकरांवर ठाकरे गटाबरोबरच महाविकास आघाडीकडून जोरदार टीका झाली. तसाच काहीसा निर्णय राष्ट्रवादीबाबतीतदेखील होण्याची शक्यता आहे. बहुतांश आमदार हे अजित पवारांसोबत आहेत, त्यामुळे निर्णय आमच्या बाजूने लागेल, असा दावा अजित पवार गटातील नेत्यांकडून केला गेला आहे, तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून दुसऱ्या चिन्हासाठी चाचपणी सुरू झाल्याची माहिती समोर येत असल्याने या चर्चा खऱ्या आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com