Mumbai News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल दिला. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांसमोर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांची मंगळवारी उलटतपासणी झाली. या सुनावणीत अजित पवार गटाचे वकील आव्हाडांना प्रश्न विचारत होते, तर जितेंद्र आव्हाड मात्र उलटतपासणीत आपल्या स्टाईलने उत्तरं देत होते.
जितेंद्र आव्हाडांनी उलटतपासणीत दिलेल्या उत्तरांवरून आणि बेजबाबदारपणे उत्तरं देण्याच्या स्वभावावरून शरद पवार गटाच्या वकिलांनीच स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला आहे. आव्हाडांची उलट साक्ष सुरू असताना अनेक वेळा अजित पवार गटाच्या वकिलांनी त्यांना टोकलं. तसेच दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही त्यांना तंबी दिली. एवढंच नाही तर त्यांच्याच वकिलांनीदेखील आव्हाडांना वारंवार अशी उत्तरं देऊ नका, अशी ताकीद दिली. पण तरीही आव्हाड मात्र आपल्याच स्टाईलमध्ये उत्तरं देत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
साक्ष नोंदवताना आवाज येत नसल्याने आव्हाडांनी मोठ्याने बोलावं, अशी विनंती अजित पवारांच्या वकिलांनी केली. त्यानंतर आव्हाडांनी मोठ्याने उत्तर देत त्यासोबतच माईकदेखील जोरात हलवला. या सर्व प्रकारावरून अध्यक्षांनी त्यांना तंबी दिली आणि रागावले. सुनावणीवेळी माईक खराब असल्याचा दावा आव्हाडांनी केला. तर ते वेळ काढण्याचा प्रयत्न करीत आहेत, असंदेखील अध्यक्षांचं म्हणणं आहे. तसेच आव्हाडांची उत्तरंदेखील बरोबर येत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
जितेंद्र आव्हाडांची साक्ष नोंदवताना ते आक्रमकपणे उत्तरं देत होते. त्यावरून शरद पवार गटाच्या वकिलांनी आव्हाडांना सूचनादेखील दिल्या. अजित पवार गटाच्या वकिलांनी प्रश्न विचारल्यावर ते तातडीने उत्तरं देत होते. मात्र उत्तरं हळू द्यायची असतात, जेणेकरून अध्यक्षांना नोंद घेता येईल. परंतु प्रत्येक प्रश्नानंतर ते त्वरित उत्तरं देत असल्यामुळे वकिलांनी नाराजी व्यक्त केली.
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे हजरजबाबीपणे उत्तरं देत असल्यामुळे अध्यक्षांकडून आणि अजित पवारांच्या वकिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र तुम्ही थोडक्यात उत्तरं द्या, जी स्क्रीन तुमच्यासमोर ठेवण्यात आली, त्याकडे बघा, अशी वारंवार विनंती त्यांच्या वकिलांकडून करण्यात आली. पण आव्हाड काही मागे हटायला तयार नव्हते. आव्हाडांनी त्यांच्या स्टाईलने उत्तरं देणं हे सुरूच ठेवलं.
जितेंद्र आव्हाड यांची उलटतपासणी सुरू असताना त्यांच्यावर अजित पवार (Ajit Pawar) गटाचे वकील संतापले. वकिलांना विचारलेल्या प्रश्नांवर उलट उत्तर देणं, कोणते प्रश्न विचारायचे आणि कोणते प्रश्न विचारायचे नाहीत, यावर आव्हाड यांनी आक्षेप घेतला होता. मात्र त्यावर अजित पवार गटाकडून आव्हाडांना शांत बसण्यासाठी सांगण्यात आलं. प्रश्न काय विचारायचे नाहीत, हे आम्हाला अध्यक्ष सांगतील. ते तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हाला फक्त विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं द्यायची आहेत, अशा शब्दांत आव्हाडांना खडसावण्यात आलं.
(Edited By : Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.