NCP MLA Disqualification Case : अजित पवार गटाच्या आमदारांची फेरतपासणी सुरू, सुनील तटकरे म्हणाले...

Sunil Tatkare News : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना विचारण्यात आलेली प्रश्न आणि त्यांनी दिलेली उत्तरे आली समोर
Sunil Tatkare
Sunil Tatkaresarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar group MLA Hearing : राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी गुरुवारी पुन्हा सुनावणी सुरू आहे. आज अजित पवार गटाच्या आमदारांची फेरसाक्ष होणार आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अनिल पाटील यांची आज फेरसाक्ष होत आहे. तर काल शरद पवार गटाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि अमोल कोल्हे यांची उलटतपासणी झाली होती.

दरम्यान आज सुनावणी दरम्यान वकिलांनी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारलेले प्रश्न आणि त्यावर तटकरे यांनी दिलेली उत्तरे काय होती, ही माहिती समोर आली आहे. (NCP MLA Disqualification Case)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sunil Tatkare
Mahavikas Aghadi News : 'वंचित'-'एमआयएम' वेटिंगवर; एकाला आघाडीत जायचंय, तर दुसऱ्याला नव्या भिडूचा शोध...

वकील आणि सुनील तटकरेंमधील सवाल-जवाब

वकील- तुम्हाला असे म्हणायचे आहे का, की 2019मध्ये शरद पवार यांनी भाजपबरोबर न जाण्याचा निर्णय घेतला होता, त्याला पक्षातील पदाधिकारी हे सहमत होते.

सुनिल तटकरे(Sunil Tatkare)- भाजप राष्ट्रवादी सरकार स्थापन झाले होते. ज्यात फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली होती. पुढे काय झाले ते माहिती आहे.

वकील- अजित पवार यांनी 2019ला जी शपथ घेतली त्यामुळे भाजप आण् राष्ट्ववादी युती झाली होती असे म्हणायचे आहे का?

सुनिल तटकरे- होय, पण ती पुढे टिकू शकली नाही.

वकील- अजित पवार(Ajit Pawar) यांना 2019मध्ये शपथ घेण्सासाठी एनसीपी राजकीय पक्ष आणि त्याचे नेतृत्व, विधिमंडळ पक्षाने नेतृत्वाची परवानगी होती.

सुनिल तटकरे- होय.

वकील - ही मान्यता कशी दिली हे सांगू शकाल का?

सुनिल तटकरे- मला सांगता येणार नाही.

वकील- तुम्हाला या सरकारला पाठिंबा काढून घेण्याबद्दल कसे कळले.

सुनिल तटकरे- पक्षाची बैठक बोलवण्यात आली आणि सांगण्यात आले.

Sunil Tatkare
BJP Vs Bhujbal : भुजबळांना मतदारसंघातच 'पाणी' दाखवण्यासाठी भाजपच्या पवारांनी वापरलं 'बळ'

वकील- त्यावेळी तुम्ही किंवा तुमच्यावतीने या निर्णयाला विरोध करण्यासाठी काही केले होते का?

सुनिल तटकरे- त्यावेळी तशी परिस्थिती नव्हती.

वकील- तुम्हाला आठवते का सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या या निर्णयाच्या विरोधात पदाधिकारी किंवा नेते यांनी विरोध केला होता का?

सुनिल तटकरे- होय पक्षात या निर्णयाला विरोध होता.

वकिल- जरी या मताशी काही लोक असहमत होती तरी त्यांनी तो स्वीकारला होता का?

सुनिल तटकरे- होय, काही पर्याय नव्हता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com