Rohit Pawar : राष्ट्रवादी फुटीचं पूर्ण खापर अजितदादांवर फोडता येणार नाही..; रोहित पवार म्हणाले, '.. तेच बडवे आहेत का..?

Maharashtra Politics : कोण कशासाठी गेले आहेत, याचा अंदाज आम्हाला आला आहे.
MLA Rohit Pawar
MLA Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP Crisis: अजित पवारांच्या बंडामागे छगन भुजबळांची मोठी भूमिका लक्षात घेता शरद पवार यांची पक्षफुटीनंतरची पहिली सभा शनिवारी (ता. ८) येवल्यात होत आहे. भुजबळांनीही शक्ती दाखवत पवारांविरोधात नाशिकमध्ये रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी नाशिक येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी रोहित पवार यांनी पक्षातील बंडखोर आणि भाजपवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादीतील फुटीवर विचारलेल्या प्रश्नांवर रोहित पवार म्हणाले, "अजित दादांवर पूर्ण खापर फोडता येणार नाही.पवार साहेबांच्या अवती भोवती काही लोक होती,"

MLA Rohit Pawar
Neelam Gorhe Joins Shinde Group: शिंदे गटातील प्रवेशानंतर तासाभरातच नीलम गोऱ्हेंना मोठं गिफ्ट, प्रवीण दरेकरांनी मांडला प्रस्ताव..

'शरद पवार यांच्याबद्दल आजही आमच्या मनात प्रेम आहे. ते आमचे विठ्ठल आहेत. पण विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. त्यामुळे साहेब तुम्ही बडव्यांना दूर करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या', अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्या भावना नुकत्याच व्यक्त केल्या होत्या.

भुजबळांच्या या विधानाचा रोहित पवारांनी यावेळी समाचार घेतला. भुजबळांचे नाव न घेता, रोहित पवारांनी "बडवे होते असे म्हणत असतील तर तेच बडवे आहेत का ? असा सवाल उपस्थित केला आहे.

MLA Rohit Pawar
BJP On Rahul Gandhi: राहुल गांधींना बोलण्याचे प्रशिक्षण काँग्रेस देणार का ?; भाजपनं डिवचलं

कोण कशासाठी गेले आहेत, याचा अंदाज आम्हाला आला आहे. पार्टीमुळे आणि शरद पवारांमुळे आमदार निवडून आले आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांना आमदारांना साद घालण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आमदार संभ्रमात आहेत. आम्हाला त्यांचा अंदाज आला आहे. काही लोकांच्या बाबतीत सकारात्मक आहोत, " यावेळी रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट का पडली याचेही उत्तर दिले.

जशास तसे उत्तर देऊ...

रोहित पवार म्हणाले, "जे गेले त्यांच्यावर बोलून वेळ वाया घालवायचा नाही. पवार घराणे भाजपने फोडले आहे. त्यामुळे भाजपचा विरोध करावाच लागणार आहे. फुटीर काही बोलले तर जशास तसे उत्तर देऊ. आमच्या मताचे विभाजनाचा भाजपलाच फायदा होणार आहे. आता भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेलेल्या लोकांचा विरोध करणार आहोत,"

आज (शनिवारी ) येवला बाजार समितीच्या मैदानावर पवारांची सभा होणार आहे. स्थानिक नेते माणिकराव शिंदे व अन्य पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी सभा स्थळांची पाहणी केली.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com