Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची दोन वर्षांची शिक्षा कायम राहणार आहे. आज (शुक्रवारी) गुजरात उच्च न्यायालयाने त्यांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. या प्रकरणा व्यतिरिक्त राहुल गांधी यांच्यावर किमान दहा खटले प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत सुरत न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे न्यायालयाने म्हटलं आहे.
न्यायालयाच्या या निर्णयावर भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी हल्लाबोल केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
राहुल गांधी यांना काँग्रेसने त्यांच्या बोलण्यावर ताबा ठेवण्यात येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, राहुल गांधी यांनी बोलण्याचे प्रशिक्षण काँग्रेसने दिले पाहिजे, असा टोला रविशंकर प्रसाद यांना लगावला आहे.
राहुल गांधी काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी पक्षातील वरिष्ठांनी व्यवस्थितपणे बोलण्याचे प्रशिक्षण द्यावे, कारण प्रसिद्ध नेता, संघटना यांच्याविषयी वाईट बोलणे, त्यांना बदनाम करणे ही राहुल गांधी यांची जुनी खोड आहे, असा टोला रविशंकर प्रसाद यांनी लगावला आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणी माफी मागितली असती तर हे प्रकरण येथेच संपले असते, असे रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.
2019 मध्ये राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभेत मोदी आडनावाबाबत विधान केले होते. म्हटले होते - सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते. यानंतर गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला.
24 मार्च रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास राहुल यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले. केरळमधील वायनाड येथून ते लोकसभेचे सदस्य होते. लोकसभा सचिवालयाने एक पत्र जारी करून याबाबत माहिती दिली होती. लोकसभेच्या वेबसाईटवरूनही राहुल यांचे नाव हटवण्यात आले आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.