
supriya sule Covid 19 Positive
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची (corona ) लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे.
"मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या,'' असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
देशात दुसरी लाट ओसरते तोच कोरोनाच्या दुसरा नवा व्हेरीयंट ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे. ओमिक्रॉनचा (Omicron) प्रादुर्भाव वाढत असून हळूहळू देशात तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारीच्या उपययोजना राबविण्यात येत आहेत. राजधानी दिल्ली, महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये नाईट कर्फ्यु लावण्यात आला आहे. महाराष्ट्रातही राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण वाढविण्यावर भर दिला जात आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्या आधीच मंगळवारी (२८ डिसेंबर) राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. वर्षा गायकवाड सोमवारी हिवाळी अधिवेशनातही उपस्थित होत्या. अनेक मंत्री, आमदार अधिवेशन काळात वर्षा गायकवाड यांच्या संपर्कात आले. मंत्री गायकवाड यांनीही स्वतः ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर आज सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे.
सुप्रिया सुळेंनी ट्विटरवरून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी 'ताई काळजी घ्या, ताई लवकर बऱ्या व्हा, अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी सुप्रिया सुळे यांचे हे ट्वीट रिट्वीट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.