नितेश राहिले बाजूला आता नारायण राणेच आले अडचणीत!

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना पोलिसांनी नोटीस बजावली असून, त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Nitesh Rane and Narayan Rane

Nitesh Rane and Narayan Rane

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना न्यायालयाकडून तातडीने दिलासा मिळू शकलेला नाही. जिल्हा सत्र न्यायालयाने आज त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना पोलिसांनी नोटीस बजावली असून, त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना नितेश यांच्या ठावठिकाण्याबद्दल वक्तव्य केले होते. नितेश हे गायब असून, ते कुठे आहेत या प्रश्नावर राणे यांनी वक्तव्य केले होते. नितेश राणे कुठे आहेत, हे मी सांगणार नाही. मला माहिती असले तरी मी ते तुम्हाला का सांगू, असे विधान नारायण राणेंनी केले होते. राणेंना त्यांचे पुत्र कुठे आहेत, हे माहिती असूनही ते सांगत नाहीत, असा अर्थ पोलिसांनी काढला आहे. त्यामुळे त्यांना आज दुपारी 3 वाजता पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी बजावली आहे. यामुळे राणेच आता अडचणीत आल्याचे दिसत आहे.

नितेश राणे यांच्या वतीने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. यावर काल (ता.28) न्यायालयात साडेतीन तास सुनावणी झाली. न्यायालयाकडून त्यांना तातडीने कोणताही दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्याने तो वाढवून देण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी केली. परंतु, न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेतली आहे. आता ही सुनावणी सुरू आहे.

न्यायालय राणेंच्या जामिनावर कोणता निर्णय यावर ते अटक होणार की नाही हे स्पष्ट होईल. मात्र, पोलीस दलाने आधीपासूनच पूर्ण तयारी केली आहे. कणकवली पोलीस ठाण्यात हालचालींना वेग आला आहे. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पोलीस ठाण्यात सुरू आहे. राणेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यास पोलीस तातडीने अटक करण्याच्या हालचाली करतील, असे चित्र आहे.

<div class="paragraphs"><p>Nitesh Rane and Narayan Rane</p></div>
प्रचारात पीयूष जैन यांचाच बोलबाला! अखेर मोदी-शहांकडूनही अखिलेश यादवांना विचारणा

प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या नॉट रिचेबल आहेत. कालपासून त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल येत आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात अटक होण्याच्या शक्यतेने ते गायब झाल्याची चर्चा सध्या सुरु आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु असून पोलिसांची पथके गोव्यातही त्यांच्या शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत.

<div class="paragraphs"><p>Nitesh Rane and Narayan Rane</p></div>
भाजपनं चुकून आपल्याच पक्षाच्या उद्योगपतीवर छापे मारले!

काय आहे प्रकरण?

संतोष परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय आणि करंजे गावचे माजी सरपंच आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान 18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर हल्ला झाला. इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार शस्त्राने परब यांच्यावर वार केले. या हल्ल्यात परब जखमी झाले. परब यांनी आपल्यावरील हल्ल्याला नितेश राणे यांचे नाव घेतले. त्यानंतर या हल्ल्याच्या तपासाची मागणी शिवसेनेने लावून धरली. तसेच या प्रकरणाला राजकीय शत्रुत्वाच्या संशयावरून नितेश राणे यांच्यासह आणखी काही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना पकडण्याच यश आले आहे. यातील मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. . सातपुते हा नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असल्याने या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे स्वत: या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com