नवी मुंबईतील कार्यकर्त्यांना जयंत पाटलांच्या कानपिचक्या

NCP|Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
Jayant Patil, JItendra Awhad & Shashikant Shinde
Jayant Patil, JItendra Awhad & Shashikant ShindeSarkarnama

नवी मुंबई : राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षाच्या नवी मुंबई (Navi Mumbai) जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक आज (ता.30 मार्च) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी पाटलांनी राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या देत निवडणुका (Municipal Election) जवळ येत असल्याने अंतर्गत वाद बाजूला सारा आणि निवडणुकीच्या कामाला लागा, अशा सुचना दिल्या आहे.

Jayant Patil, JItendra Awhad & Shashikant Shinde
`संजय राऊत यांचं तोंड 24 तासही बंद राहू शकले नाही...`

आज पार पडलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे सुद्धा उपस्थितीत होते. यावेळी नवी मुंबईतील विविध विषय, संघटनात्मक रचना आणि आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. यावेळी नवी मुंबईचे प्रभारी शशिकांत शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे, शहराध्यक्ष अशोक गावडे, प्रदेश उपाध्यक्ष नामदेव भगत, निरीक्षक प्रशांत पाटील, प्रदेश सरचिटणीस भालचंद्र नलावडे, चंद्रकांत पाटील, संदीप सुतार, राजू शिंदे, वैभव गायकवाड, गणेश शिंदे, अनू आंग्रे, महिला अध्यक्ष प्राजक्ता मोंडकर, महिला कार्याध्यक्ष सुनिता देशमुख, नितीन चव्हाण आणि राजू देशमुख उपस्थित होते.

Jayant Patil, JItendra Awhad & Shashikant Shinde
फडणवीसांवर टिका करणाऱ्या अतुल लोंढेंनी वार्डातून तरी निवडून यावे…

पाटील म्हणाले, निवडणुका जवळ येत असल्याने पक्षातील अंतर्गत वाद बाजूला सारून एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्वांनी कामाला लागायला हवे. आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुक स्वबळावर लढायची की महाविकास आघाडी म्हणून लढायची ते नंतर ठरवले जाईल. मात्र, सध्या कामाला लागा, अशा सुचना पाटलांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिल्या आहे.

Jayant Patil, JItendra Awhad & Shashikant Shinde
पोलिस, हिंदुत्ववादी संघटनांच्या वादात भुजबळांची मध्यस्थी!

बैठकीनंतर नवी मुंबईचे प्रभारी आणि आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, नवी मुंबई कार्यकर्त्यांची जयंत पाटील साहेबांनी बैठक बोलावली होती. पक्ष संघटना मजबुत करा, नीट बांधणी करा, सरकारची कामे लोकांपर्यंत पोहचवा, अशा सूचना त्यांनी आम्हाला दिल्या आहेत. तसेच, नवी मुंबई राष्ट्रवादीत कुठलाही अंतर्गत वाद नसून काही कुणाची नाराजी असेल तर ती दूर केली जाईल. आम्ही नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून सोबत लढणार आहोत, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com