Sanjay Raut On Rane: राऊतांच्या खासदारकीसाठी मी पैसा खर्च केला..' असं म्हणणं राणेंना भोवणार ; राऊतांनी राणेंना...

Sanjay Raut News : बाळासाहेबांच्या सांगण्यावरून मी संजय राऊत यांचा अर्ज भरून घेतला होता. निवडणुकीच्या यादीत त्यांचे नाव देखील नव्हते.
Narayan Rane, Sanjay Raut
Narayan Rane, Sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

Sanjay Rane Vs Narayan Rane : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्या खासदारकीवर भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी केलेल्या दाव्यावरून वाद निर्माण झाला आहे. हा वाद आता न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांना खासदार बनवले आणि त्यासाठी मी पैसा खर्च केला," असं विधान भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते, या विधानावरुन राणेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांना याप्रकरणी मानहानीची नोटीस पाठवली आहे.

Narayan Rane, Sanjay Raut
Nashik Graduate Election Result: भाच्याच्या जल्लोषात मामाची कार ; सत्यजीत तांबेचं स्वप्न पूर्ण

"राणेंना नोटीस पाठवण्यात आली असून, त्यांना कोर्टात उत्तर द्यावं लागेल. राणे यांना सर्वात आधी बाळासाहेब ठाकरे यांनीच पद दिलं होतं, याचं भान त्यांनी राखावं. आमचं नाण खणखणीत आहे," असे राऊत यांनी आज (शुक्रवारी) माध्यमांशी बोलताना सांगितले.

राणे म्हणाले होते की, 2004मध्ये मी विरोधी पक्षनेता असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला संजय राऊत यांना खासदार बनविण्यास सांगितले होते. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना दुसऱ्यालाच खासदार बनवायचे होते. पण बाळासाहेबांच्या सांगण्यावरून मी संजय राऊत यांचा अर्ज भरून घेतला होता. निवडणुकीच्या यादीत त्यांचे नाव देखील नव्हते.

Narayan Rane, Sanjay Raut
Meghalaya Assembly Election 2023 : युवक, महिलांच्या हाती मेघालयाचं राजकीय भवितव्य ; BJP कडून उमेदवार जाहीर

नारायण राणे म्हणाले, "संजय राऊत यांच्या अर्जावर काँग्रेस नेते रोहिदास पाटील यांनी आक्षेप घेतला. पण संजय राऊत हा माझा माणूस असल्याचे सांगत मी विनंती केल्यावर रोहिदास पाटील यांनी पुढे आक्षेप घेतला नाही. संजय राऊत यांना खासदार बनविण्यासाठी किती पैसा खर्च केला ते आता सांगणार नाही,"

पैसे खर्च केले म्हणजे नेमके काय केले होते? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. "यादीत माझे नाव नव्हते, हे नारायण राणे यांनी सिद्ध करून दाखवावे. असे पैसे खर्च करणे म्हणजे लाचलुचपतप्रतिबंधक कायद्याअंतर्गत हे प्रकरण येते, असे राऊत म्हणाले. "राणे यांना सर्वात आधी बाळासाहेब ठाकरे यांनीच पद दिलं होतं, याचं भान त्यांनी राखाव. राणे भाजपच्या नादाला लागून खोटं बोलत आहेत. राणेंचे दावे हास्यपद आहेत,"असे राऊत यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com