राष्ट्रवादीने केली विरोधात बसण्याची तयारी!

शक्य तेवढी आणि जमेल तितकी मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करत साथ देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला.
NCP
NCPSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेतील (Shivsena) बंडाच्या पार्श्वभूमीवर ‘सिल्व्हर ओक’वर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रमुख नेत्यांची ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात शक्य तेवढी आणि जमेल तितकी मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करत साथ देण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाकरे यांच्या निर्णयाची राष्ट्रवादी वाट बघणार असून वेळ आली तर विरोधात बसायची तयारीही राष्ट्रवादीने केली आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बैठकीनंतर दिली. (NCP ready to sit in opposition : Jayant Patil)

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. तसेच, शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वार प्रतिवार सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर जयंत पाटील माध्यमांशी बोलत होते.

NCP
भाजपची मोठी ऑफर : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, तर श्रीकांत शिंदे केंद्रात मंत्री?

राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक पार पडली. त्यामध्ये सध्याचा राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. महाविकास आघाडी सरकार टिकावं, यासाठी चर्चा झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहटी येथे गेलेले आमदार परत येतील, असा आम्हाला विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांना आमचा पाठिंबा आहे. सरकार टिकविण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करणार आहोत, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

NCP
उद्धव ठाकरेंकडे उरले दोन कॅबिनेट मंत्र्यांसह केवळ पंधरा आमदार! ही नावं पक्की...

जयंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा बंगल्यावर राहण्यास पूर्वी तयार नव्हते. पण, आमच्या आग्रहानंतर ते वर्षा या निवास स्थानी राहायला आले होते. त्यांनी वर्षा सोडला म्हणजे मुख्यमंत्रीपद सोडलं, असं होत नाही. शिवसेनेतून आमदार बाहेर पडतील, असे कधी वाटले नव्हते. वेळ पडली तर विरोधात बसू, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

NCP
Eknath Shinde : अखेर कृषीमंत्री दादा भुसे एकनाथ शिंदे गटात दाखल!

आता रडायचं ठरवलं आहे. तर अशी अनेक कारणे आता देता येतात. गुवाहाटीत गेलेले सगळी मंडळी शिंदे गटात सामील व्हाययला गेली, असं नाही. त्यातील काही जण माहिती घ्यायला गेले आहेत, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

जमेल तितकी मदत उद्धव ठाकरे यांना करायची. जे शक्य आहे, ते करण्यात येईल, त्यांना साथ द्यायची. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाची वाट राष्ट्रवादी बघणार आहे. वेळ पडली तर विरोधात बसायची तयारीही राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com