Rohit Pawar on VVPAT decision : VVPAT रद्दच्या निर्णयामागे निवडणूक आयोगाचा नवा डाव, पक्षपातीपणा सिद्ध; रोहित पवारांचा घणाघात

Rohit Pawar Criticizes Election Commission VVPAT Cancellation in Local Body Polls : निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT रद्दच्या निर्णयावर एनसीपी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार निशाणा साधला.
Rohit Pawar on VVPAT
Rohit Pawar on VVPATSarkarnama
Published on
Updated on

VVPAT cancellation controversy : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगानं तयारी सुरू केली आहे. विभागवार आढावा बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. या निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन वापरली जाणार नाही, अशी भूमिका राज्य निवडणूक आयुक्तांनी जाहीर केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर विरोधक आक्रमक झाले असून, निवडणूक आयोगानं स्वतः पक्षपातीपणा सिद्ध करण्यास सुरवात केल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या या घोषणेवर समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "निवडणूक आयोगाकडून प्रत्येक निवडणुकीत नवीन खेळ केला जातो, कधी नावं वगळली जातात, कधी नवीन नावं ॲड केली जातात, तर कधी याद्यांचा घोळ घातला जातो. याबाबत आक्षेप घेतला की, त्यावर उत्तरही दिलं जात नाही. पुढच्या निवडणुकीच्यावेळी मात्र मागील आक्षेपाचे मुद्दे बाजूला ठेवून नवीन डाव टाकला जातो".

'तसाच आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT मशीन रद्द करण्याचा निर्णय घेतला का? हा निर्णय कुणाला जिंकवण्यासाठी, तर घेतला नाही ना? निवडणूक आयोगाने (Election commission) निःपक्षपाती राहणं अपेक्षित असताना आयोगावर होणारा पक्षपातीपणाचा आरोप आयोग स्वतःच्याच कृतीतून वेळोवेळी का सिद्ध करतंय?', असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

Rohit Pawar on VVPAT
Eknath Shinde Shivsena : पक्ष प्रवेश घोटाळा; शिलेदारांकडूनच एकनाथ शिंदेंची कोंडी, मेंगाळ-दराडेंनी एकमेकांची पुरती काढली!

'सध्या निवडणुकीचा खेळ ज्या पद्धतीने सुरू आहे ते पाहून भीती वाटते की, उद्या केवळ सत्ताधारी पक्षाचंच चिन्ह #EVM येऊन केवळ यांनाच निवडून द्या, असा तर आदेश निघणार नाही ना? कोणत्याही परिस्थितीत #VVPAT मशीनसहच निवडणूक घ्यावी लागेल', असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. हा निर्णय आत्मघातकी असून, त्यावर फेरविचार व्हावा, अशी मागणी याचिकेतून करण्याची तयारी पक्षाने केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात जे घोळ झाले ते न्यायालयासमोर मांडले जाणार आहे. याबाबतचा अद्याप निकाल येणे बाकी असतानाच, हा निर्णय घेऊन राज्य निवडणूक आयोग काय साध्य करत आहे, याकडे लक्ष वेधण्याची तयारी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com