Vidya Chavan Criticized Ajit Pawar : '' सगळं संपलेलं असताना पवारांना भेटायचं म्हणजे...''; विद्या चव्हाणांनी अजित पवार गटाला फटकारलं

Ajit Pawar Group Meets Sharad Pawar : '' तुमच्या हृदयात पवारसाहेब असते तर...''
Vidya Chavan, Ajit Pawar Group
Vidya Chavan, Ajit Pawar GroupSarkarnama

Mumbai : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या गटानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मागील दोन दिवसांत दोनवेळा अजित पवार गटानं पवारांची भेट घेतल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. याचदरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटा्च्या महिला नेत्या विद्या चव्हाण यांनी या भेटींवरुन अजित पवार गटाला ठणकावलं आहे.

शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण(Vidya Chavan) यांनी सोमवारी(दि.१७)माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या गटाला खडेबोल सुनावले आहे. चव्हाण म्हणाल्या, “शरद पवारांना असा त्रास देणं बरोबर नाही. तुमच्या हृदयात पवारसाहेब असते तर तुम्ही असा मार्ग निवडलाच नसता. कारण, पवार साहेबांच्या नावावर सगळे आमदार निवडून आले आहेत. पण आता त्यांनी आपल्या हृदयातून पवारसाहेबांना काढून टाकलं असून मोदींची प्रतिमा तयार केली आहे असा हल्लाबोलही चव्हाण यांनी केला.

Vidya Chavan, Ajit Pawar Group
Maharashtra Politic's : राष्ट्रवादी एकसंघ ठेवण्याची पवारांना विनंती; पण त्यांच्या मनात काय?, हे आज कसं सांगू; शरद पवारांच्या भेटीनंतर पटेलांची प्रतिक्रिया

'' साहेबांना पुन्हा पुन्हा भेटायचं म्हणजे...''

विद्या चव्हाण यांनी अजित पवार गटाच्या आमदारांनी मागील दोन दिवसांत दोनवेळा शरद पवारांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतल्यावर भाष्य केलं. चव्हाण म्हणाल्या, आता सगळं संपलेलं असताना शरद पवारां(Sharad Pawar)ना पुन्हा पुन्हा भेटायचं म्हणजे त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचा, हे बरोबर नाही. याचवेळी भाजपासोबत जाता येणार नाही असा खुलासा शरद पवारांनी केल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

तसेच मोदींसोबत पवारांना जाता येणार नाही. सर्वधर्म समभाव मानणारे पवार नरेंद्र मोदींसोबत जाऊ शकत नाही हे माहीत असताना त्यांना भेटायला जाणं हे बरोबर नाही असंही विद्या चव्हाण म्हणाल्या.

Vidya Chavan, Ajit Pawar Group
NCP Mla Meets Sharad Pawar : अजित पवार गटाला उपरती ; साहेब आमचे नेते..

30 आमदारांची भूमिका समजून घ्या

रविवारी (दि.१७) अजित पवार(Ajit Pawar) गटाच्या मंत्र्यांनी मुंबईतील वायबी सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली होती. यावेळी सर्व मंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध राहावा, त्यासाठी तुम्हीच तोडगा काढा अशी मागणी मंत्र्यांनी पवार यांच्याकडे केली होती. त्यावेळी पवारांनी काहीच भाष्य केलं नाही.

मात्र, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा 30 आमदारांना घेऊन अजित पवार शरद पवारांच्या भेटील आले. या सर्वच्या सर्व 30 आमदारांची भूमिका समजून घ्या अशी विनंती अजित पवार यांनी पवारांनी केली. तसेच सर्व आमदार हे पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेल्याचंही अजित पवार गटाकडून सांगितलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com