Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य यांनी आज (ता. १८ जुलै) शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. पक्ष एकसंघ राहावा, यासाठी आमदार आणि सर्व नेतेमंडळींना आज पुन्हा पवार यांना विनंती केली. कालच्या प्रमाणे आजही आमचं आणि आमच्या आमदारांचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. (MLAs requested Sharad Pawar to keep the NCP party united)
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह त्यांच्या गटाचे सर्व मंत्री, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी रविवारी (ता. १६ जुलै) वायबी सेंटरमध्ये भेट घेतली. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अजित पवार आणि विधीमंडळाचे राष्ट्रचादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्व आमदार (MLA) ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आले होते. काल सर्व मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, खासदार यांनी भेट घेतली हेाती. रविवार (ता. १६ जुलै) असल्यामुळे पक्षाचे आमदार मतदारसंघात होते. पण, विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यामुळे सर्व आमदार आज उपस्थित होते. त्यामुळे आमदारांना आशीर्वाद मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांना भेटायला आलो होतो.
सर्व आमदारांनी शरद पवारांचा आशीर्वाद घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकसंघ राहावा, यासाठी आम्ही काल विनंती केली होती, तशीच विनंती आजही आम्ही केली आहे. पवारसाहेबांनी कालच्या प्रमाणे आजही आमचे म्हणणे ऐकून घेतले आहे. पण, त्यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या मनात काय आहे, हे मी आज कसं सांगू शकतो, असा सवालही प्रफुल्ल पटेल यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.