
NCP Vs BJP News: दोन माजी मंत्री आणि माजी आमदार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश झाला. हा प्रवेश महायुतीतील घटक पक्षांसाठी वादाचा विषय ठरला आहे. भाजपने याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जळगाव जिल्ह्यात सहकार व अन्य क्षेत्रात सक्रिय यंत्रणा होती. त्या माध्यमातून हा पक्ष विधानसभेनंतरही तग धरून होता. मात्र, आता घरातच राजकीय आव्हान आणि प्रति आव्हान सुरू झाले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश झाले आहेत.
यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. हे लोन जळगाव जिल्ह्यात अन्यत्र देखील पोहोचण्याचा धोका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी त्यासाठी जोरात कामाला लागले आहेत.
माजी मंत्री आणि आमदार अनिल पाटील (Anil Patil) हे आपल्या अमळनेर मतदारसंघात प्रतिस्पर्धी पक्षांच्या नेत्यांना आकर्षित करीत आहेत. माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, महिला आघाडीच्या तीलोत्तमा पाटील यांचा प्रवेश झाला. काठावर असलेल्या नेत्यांना आता सत्ता खुणावू लागली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने महायुतीतील घटक पक्षांना प्रभावी कामगिरीचे आव्हान आहे. भाजपच्या (Bjp) खासदार स्मिता वाघ यांनी देखील भाजपमधील इनकमिंग वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. महाविकास आघाडीचे विविध नेते त्यांच्या संपर्कात आहेत. भाजपमध्ये हे पदाधिकारी प्रवेश करतील, असा दावा त्यांनी केला आहे.
अमळनेर मतदारसंघात माजी आमदार शिरीष चौधरी आणि साहेबराव पाटील यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष आपले अस्तित्व टिकवून आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला गळती लागली आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि भाजप यांच्यातच जुंपण्याची चिन्हे आहेत.
येत्या काळात बहुतांशी पदाधिकारी आणि नेतेमंडळींना आता सत्तेच्या सावलीत जावेसे वाटते आहे. निवडणुकीच्या निकालाने महायुतीचा उत्साह वाढला आहे. या स्थितीत विरोधी पक्षाचे नेते देखील फारसे सक्रिय नाहीत. त्याचा फटका महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना बसू लागला आहे. अमळनेर मतदारसंघातील राजकीय चित्र येत्या काही दिवसात अंतरबाह्य बदलण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.