
Mumbai News : मुंबई कल्याणमधील मराठी कुटुंबियावर हल्ला, बारामतीत खुनांच्या घटना, मुख्यमंत्र्यांच्या शहरात पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या महिला कर्मचार्याला मारहाण, खून, मारामारी, दहशत माजवण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे.
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही, अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात चालेल्या या सर्व प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचक पोस्ट केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमधून खासदार सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठी अपेक्षा व्यक्त केली आहे.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या घटनांमुळे राज्यात सध्या अस्थितरता दिसते. रोज कुठेना कुठेतरी मारामाऱ्या, खून, दहशत माजवणे, असे प्रकार होत आहेत. मुंबईच्या कल्याणमधील घटनेने पुन्हा एकदा मराठी-परप्रांतीय वाद उफळला आहे. महायुती (Mahayuti) सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे कार्यकर्ते यावरून आक्रमक झालेत.
राज्यात सध्या बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्येचे प्रकरण गाजत आहेत. यातच मुंबईतील मराठी कुटुंबियांवर परप्रांतीय शेजाऱ्याने हल्ला केल्याने अधिकच वाद पेटला आहे. यावरून विधानसभेत गदारोळ सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्चचिन्ह उपस्थित करणारी पोस्ट एक्स खात्यावर शेअर केली आहे.
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही, अशी परिस्थिती आहे. खून, मारामारी, दहशत माजविण्याचे प्रकार ही नित्याचीच बाब झाली आहे. बारामतीत खून झाल्याची घटना घडली. ही गेल्या काही दिवसांतील तिसरी घटना आहे. तर तिकडे कल्याणमध्ये 'तुम्ही मराठी माणसं घाण आहात' असा आरडाओरडा करीत एका मराठी माणसाला त्याच्या राहत्या सोसायटीत गुंडांकरवी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आल्याकडे सुप्रिया सुळेंनी लक्ष वेधले.
तसेच, एवढंच नाही, तर मुख्यमंत्री महोदयांच्या शहर परिसरात पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण करुन अतिशय अपमानास्पद पद्धतीने विनयभंग करण्यात आला. या सर्व घटना संतापजनक आहेत. ही अतिशय गंभीर परिस्थिती असून सर्वसामान्य माणूस भीतीच्या छायेखाली वावरत आहे. राज्य सरकारने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन राज्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी काम करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.