NCP Split : "अजून काय पाहिजे" नंतर आता रोहित पवार म्हणतात, "मुद्यांच बोला..'; जुन्या सहकाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न

Maharashtra Politics : आपण मुद्यावर विचारुया, सरकारला मुद्यावर आणया' अशी टॅग लाईन वापरत 'मुद्यांच बोला..!' असे अभियान सोशल माध्यमातून सुरू केले आहे.
MLA Rohit Pawar
MLA Rohit PawarSarkarnama

-राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार (शरद पवार गट) रोहित पवार हे बंडखोर नेत्यांवर भावनिक प्रहार करीत आहेत

आमदार रोहित पवार यांनी "अजून काय पाहिजे" असा प्रश्न उपस्थित करत "तुम्हीच तर होता साहेबांनी ज्यांना..जपले..मोठे केले" अशी भावना समाज माध्यमातून मांडली. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे या ज्येष्ठ नेत्यांवर रोहित पवारांनी टीका केली आहे.

भुजबळ,वळसे पाटील यांनी रोहित पवारांबाबत त्यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करीत त्यांना राजकीय अनुभव कमी असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला. वळसे पाटील यांनी 'असे असले तर..आंबेगाव मधून मी राजीनामा देतो तुम्ही निवडणुक लढवा'असे आव्हान दिले, या आव्हानाला पुणे विरुद्ध नगर,सोलापूरच्या कुकडी(डावा) कालव्याच्या पाणी वाटपातील न्याय-अन्याय याचा संदर्भ होता.

MLA Rohit Pawar
Bachchu Kadu News: ...प्रार्थना ऐकली अन् बच्चू कडू यांचं मत बदललं; हे सगळं कशासाठी करायचं ?

भुजबळ यांनी "तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हा मी मुंबईचा शिवसेनेचा महापौर होतो सांगत अधिक टीका कराल तर तुमच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात येऊन उत्तर देऊ," असा इशारा रोहित पवारांना दिला.

MLA Rohit Pawar
Pune News : शरद पवारांचा फोटो दाखवून अनेकांना गंडा घालणारा पोलिसांच्या ताब्यात

कालपर्यंत एकत्र असलेले या नव्या-जुन्या सहकाऱ्यांना रोहित पवारांनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी, आपण मुद्यावर विचारुया, सरकारला मुद्यावर आणया' अशी टॅग लाईन वापरत 'मुद्यांच बोला..!' असे अभियान सोशल माध्यमातून सुरू केले आहे. याबाबत त्यांनी लागलीच कर्जत-जामखेड औद्योगिक वसाहतीचा(एमआयडीसी)च्या मान्यता असताना शासकीय मंजुरीचा मुद्दा उपस्थित करून विद्यमान महायुती सरकारला अडचणीत आणण्याचा आणि घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

राजकीय सत्ता संघर्ष, पक्षामधील उभी फूट, नवीन मंत्र्यांचे खाते वाटपाचा तिढा, मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेली सरकारला समर्थन देणारे आमदार आदी मुद्यांवर मोठी चर्चा आणि माध्यमांचा फोकस असताना यामुळे सामान्य नोकरदार नागरीकांमध्ये महागाई, शेतकऱ्यांमध्ये शेतमालाला भाव, तरुणामध्ये नोकरी-रोजगार आदी महत्वाच्या प्रश्नांवर लक्ष वाढण्याचे काम रोहित पवार करताना दिसून येत आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com