'भाजपने मुख्यमंत्र्यांना बाळासाहेबांची विचारधारा शिकवण्याची गरज नाही'

राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपवर टीका केली आहे.
Mahesh Tapase
Mahesh Tapasesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांवर सत्ता गेल्यामुळे सातत्याने आरोप करत आहेत. मात्र, सोमय्या यांच्यावरच काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सामाजिक वातावरण बिघडविण्याचा राणा (Navneet Rana & Ravi Rana) दांपत्याचा हेतू होता. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेच्या (Shivsena) विरोधात चिथावणीखोर वक्तव्य हे जाणीवपूर्वक केले जात आहेत. असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते महेश तापसे (Mahesh Tapse) यांनी केला आहे.

Mahesh Tapase
'कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने नवनीत राणांना आता जात आठवली'

भाजप सोबतची युती शिवसेनेने तोडल्याने भाजपला दुःख आहे. त्यामुळे ते भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भाजपने असे करण्याची काही गरज नाही. याबरोबरच राणा दांपत्याचा मुख्यमंत्र्याच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट धरल्याने सामाजिक वातावरण जाणीवपूर्वक बिघडविण्याचा त्यांचा हेतू होता. यामुळेच मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेनेविरोधात त्यांनी सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य केले जात आहे. मात्र, इतर नेते किंवा मुख्यमंत्री याच्याबद्दल बोलत असतांना तारतम्य ठेवायला हवे, अशा शब्दात तपासे यांनी भा़जप आणि राणा दांपत्याला सुनावले आहे.

Mahesh Tapase
सोमय्या संतापले; संजय पांडेंना आणणार अडचणीत

तपासे म्हणाले, सरकारच्या धोरणावर टीका करण्यात काही गौर नाही. मात्र, विरोधकांवर व्यक्तीगत पातळीवर टीका केली जाता आहे. हे चुकीचे आहे. दरम्यान खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्यावर हनुमान चालिसा वाचल्यामुळे गुन्हा दाखल झाला हा आरोप करण्यात येतो तो चुकीचा आहे. त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले आणि सुव्यवस्था बिगडवण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्यावर कायद्यानुसारच गुन्हा दाखल झाल्याचे तपासेंनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com