Jayant Patil News: आंदोलन करू का ? विचारायचेही नाही, थेट रस्त्यावर उतरा; जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना आदेश

NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अॅक्शन मोडवर, कार्यकर्त्यांची बैठक घेत महत्वाचे आदेश दिले आहेत.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी थेट मैदानात उतरत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राज्यातील महत्वाच्या शहरात सभा घेतल्या आहेत. एवढंच नाही तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय आढावा देखील शरद पवार घेत आहेत. आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत महत्वाचे आदेश दिले आहेत.

"आंदोलन करू का ? विचारायचे देखील नाही, थेट रस्त्यावर उतरा, आणि कामाला लागा", असे थेट आदेशच पाटलांनी कार्यकर्त्यांना दिले. पक्षाध्यक्ष शरद पवार हे आणखी काही जिल्ह्यांचे दौरे करणार असल्याची माहितीही यावेळी पाटलांनी दिली. या दौऱ्यादरम्यान शरद पवार पक्ष संघटनेचा आढावा घेतील. याबरोबरच आगामी निवडणुका पाहता ते मतदारसंघाचा देखील आढावा घेत पदाधिकाऱ्यांची चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Jayant Patil
Solapur Loksabha : प्रणिती शिंदे यांचे लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत

"राज्यातील दोन पक्ष फोडण्याचे पाप भाजपने केले आहे. त्यामुळे अनेकांच्या मनाला ठेच लागली आहे. जे सभ्य असतात ते अंगावर येत नाहीत, पण मतदानातून ते दाखवून देतील", असा इशारा देत आपण जर घरात बसलो तर पक्षाचे अस्तित्व दिसणार नाही, त्यामुळे संघर्ष करा आणि रस्त्यावर उतरा, कामाला लागा, असे जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले आहे.

Jayant Patil
Santosh Bangar News : आमदार बांगरांचा वादग्रस्त विधानांचा 'सिलसिला' कायम; आता म्हणाले, ...तर पोलिसांना भगव्या टोप्या देईन!

राष्ट्रवादीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत बोलताना जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देत कोणताही सर्व्हे घ्या, तुम्हाला उत्तरं सापडतील, असा सल्ला देत फक्त फोटो काढण्यापुरते आंदोलने करु नका, अशी कानटोचणीही त्यांनी केली. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील मैदानात उतरणार आहेत.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com