Santosh Bangar News : आमदार बांगरांचा वादग्रस्त विधानांचा 'सिलसिला' कायम; आता म्हणाले, ...तर पोलिसांना भगव्या टोप्या देईन!

Shivsena Political News : ...म्हणून शिंदेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार !
MLA Santosh Bangar
MLA Santosh BangarSarkarnama

Hingoli : शिंदे गटाचे नेते आणि आमदार संतोष बांगर हे त्यांच्या कधी वादग्रस्त विधानांमुळे तर कधी अधिकाऱ्यांना मारहाण, दमदाटीमुळे अनेकदा अडचणीत आले आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. या त्यांच्या वक्तव्यामुळ नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, तर पोलिसांना भगव्या टोप्या देईन, असे वादग्रस्त विधान आमदार बांगर यांनी केले आहे.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या हिंगोलीतील सभेनंतर दुसऱ्याच दिवशी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर(Santosh Bangar) यांनी मतदारसंघात कावड यात्रा काढली. या कावड यात्रेद्वारे त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या कावड यात्रेला यावेळी बांगर यांनी पोलिसांना भगव्या टोप्या देण्याचे वादग्रस्त विधान केले. त्यांचे हे विधान सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

MLA Santosh Bangar
MLA Santosh Bangar News : ठाकरेंनी गाडून टाकण्याची भाषा केली, अन् बांगरांचा जोश अजूनच वाढला..

संतोष बांगर नेमकं काय म्हणाले ?

संतोष बांगर यांनी कावड यात्रेत केलेल्या भाषणात म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी राज्यात आमची सत्ता आली तर सर्वांना भगव्या टोप्या देईल असे म्हणाले होते. त्यामुळे कदाचित मी मुख्यमंत्री झालो तर सर्व पोलिसां(Police)नाही भगव्या टोप्या देईन असे सांगितले. माझ्याविरोधात जिल्ह्यातील चांडाळ चौकडी जमली आहे असे सांगतानाच आता झालेला त्यांचा जिल्हाप्रमुख 4 पक्ष बदलून आल्याचा आरोपही त्यांनी केला.

तसेच उद्धव ठाकरेंनी हिंगोलीत वेड्यांची जत्रा भरवली. वेडे काहीच करू शकत नाहीत. त्यांच्या अंगावर धावून गेले की, ते भुर्रकन पळून जातात. त्यांच्या सभेचा आमच्या सभेवर कोणताही परिणाम पडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याचसोबत त्यांनी ठाकरेंवर टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, आता आपला बाप चोरल्याचे म्हणणे बंद करावे. बाळासाहेब ठाकरे आमचे सर्वांचे आहेत. त्यामुळे कुणीही एकाने ते आमचे बाप असल्याचा दावा करू नये. बाळासाहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचे बाप आहेत असेही ते म्हणाले.

MLA Santosh Bangar
CM Eknath Shinde News : असा झटका दिला, की ऑनलाइनवाले लाईनवर आले ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचे काम राज्यातील जनता पाहत आहे. त्यामुळे शिंदेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. आम्ही सत्तेत राष्ट्रवादीसोबत बसलो. पण राष्ट्रवादी स्वतः या सत्तेत सहभागी झाली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व मान्य केले आहे, असे बांगर यावेळी म्हणाले.उद्धव ठाकरेंनी आमच्या कावड यात्रेतील गर्दी पहावी. त्यानंतर आपल्या छातीवर हात ठेवून ही ताकद कुणाची हे सांगावे, असे आव्हानही त्यांनी यावेळी ठाकरेंना दिले.

...तेव्हा त्यांना गुंड वाटलो नाही!

बांगर म्हणाले, मी मागील 38 वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहे. गत 14 वर्षांपासून मी जिल्हाप्रमुखपदावर काम करतोय. तेव्हा मी त्यांना गुंड वाटलो नाही. त्यावेळी हेच उद्धव ठाकरे म्हणायचे की, बाळासाहेबांचा शिवसैनिक असाच असला पाहिजे. ज्या शिवसैनिकाच्या अंगावर केस नाहीत, ते माझे शिवसैनिक होऊच शकत नाहीत, असे बोलणारेही हेच उद्धव ठाकरे आहेत असा टोलाही बांगरांनी लगावला.

MLA Santosh Bangar
Rohit Pawar News : महाराष्ट्रात गुंतवणूक कुणाच्या काळात जास्त ? रोहित पवारांनी थेट आकडेवारीच समोर ठेवली

...म्हणूनच शिंदेच मुख्यमंत्री राहणार !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम राज्यातील जनता पाहत आहे. त्यामुळे शिंदेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. आम्ही सत्तेत राष्ट्रवादीसोबत बसलो. पण राष्ट्रवादी स्वतः या सत्तेत सहभागी झाली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व मान्य केले आहे, असे बांगर यावेळी म्हणाले. ठाकरेंनी आमच्या कावड यात्रेतील गर्दी पाहावी. त्यानंतर आपल्या छातीवर हात ठेवून ही ताकद कुणाची हे सांगावे, असे खुले चॅलेंजही आमदार संतोष बांगरांनी ठाकरेंना दिले.

ठाकरे बांगरांना काय म्हणाले होते..?

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच हिंगोलीत सभा झाली. या सभेत त्यांनी भाजपसह शिंदे गटाचे स्थानिक आमदार संतोष बांगरांचा समाचार घेतला होता. त्यावेळी त्यांनी त्यांनी बांगर यांचा उल्लेख नाग म्हणून केला. आम्ही गद्दाराची नाग समजून पूजा केली. पण, हा नाग उलटा फिरून आम्हालाच डसायला लागला. साप पायाखाली आल्यावर काय करायचे हे तुम्हाला सांगायची गरज नाही. पुंगी वाजवली, दूध पाजले, सगळे वाया गेले असा हल्लाबोल ठाकरेंनी केला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com