Nagar Vikhe Vs Thorat News : अहमदनगरमधील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची राज्यभरात चर्चा झाली. कारण, गणेश सहकारी साखर कारखान्यावर गेल्या आठ वर्षांपासून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सत्ता होती. ही सत्ता माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी एकत्र येत हिसकावून घेतली. यामुळे विखे पाटील यांची भाजपमध्ये कोंडी होत असल्याची चर्चा आहे.
सोमवारी झालेल्या मतमोजणीत थोरात-कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन मंडळाने 19 पैकी 18 जागा जिंकून दिमाखदार विजय संपादन केला. या निवडणुकीमध्ये भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विखे पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा झाली. गणेश सहकारी साखर कारखान्याची भाजप विरुद्ध भाजप अशीच झाली. बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या मदतीनेच विखे पाटलांना धोबीपछाड दिली.
या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपमध्ये (BJP) विखे यांची कोंडी होत आहे का? याची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. कारण, काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते माजी मंत्री राम शिंदे यांनीही विखे पाटलांवर आरोप केले होते. त्यांची विखे पाटलांची तक्रार वरिष्ठांकडे करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता कोल्हे यांनी थेट पणे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा झाली.
राम शिंदे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये विखे पाटील यांनी सहकार्य केले नाही, असा आरोप केला होता. तसेच विखे पाटील ४० वर्ष ज्या पक्षात होते, त्या पक्षाने त्यांना जे दिले नाही, ते भाजपाने दिले. ज्या पक्षात राहतात त्याच पक्षाला विरोध करायचा हे आज देखील त्यांचे चालू आहे. मात्र, हा काँग्रेस (Congress) नाही, तर भाजपा आहे, हे त्यांनी लक्षात घेण्याची आवश्यकता असल्याचेही शिंदे म्हणाले होते.
गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील (RadhaKrishna Vikhe Patil) यांच्या गटाला केवळ एक जागा मिळाली. यामुळे राहता या मतदारसंघातच विखेंना पहिल्यांदाच मोठा धक्का बसला. कोल्हे-थोरात युती आणि शिंदे यांच्या आरोपांमुळे भाजपमध्ये विखे पाटील यांची कोंडी होत आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.