NCP Minister Meet Sharad Pawar: अजित पवारांचा गट दुसऱ्यांदा पवारांच्या भेटीला; राष्ट्रवादीत नेमकं शिजतंय काय?

Political News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सर्व आमदार आणि मंत्री आज पुन्हा शरद पवारांच्या भेटीला
NCP Minister Meet Sharad Pawar
NCP Minister Meet Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उलथापालथीची मालिका पंधरा दिवसांपासून नवनवे वळण घेत असून, पक्षात बंड करणाऱ्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांवर हल्ले चढवले. पक्षाच्या नव्या गटाला उभारी देत मूळ गटाला आव्हान दिले.

पवारांकडच्या उरल्यासुरल्या नेत्यांनाही आपल्याकडे खेचल्यानंतर बंड पुकारणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सारेच नेते पवारांच्या गाठीभेटी घेत आहेत. याच नेत्यांनी रविवारी दुपारी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर सोमवारी पुन्हा साहेबांच्या भेटीला आले. राष्ट्रवादीतील अशा धक्यांमुळे राजकीय वर्तुळ पुरते हदरत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पक्षात बंड करत सरकारमध्ये सामील होत पवारांना धक्का दिला. त्यानंतर थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावाही सांगितला. एवढंच नव्हे तर दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे मेळावे घेत थेट एकमेकांवर टीकास्त्र सोडले. अजितदादांनी पक्षात घडलेल्या याआधीच्या राजकारणाचा दाखला देत पवारांचा एक प्रकारे इतिहासच सर्वांसमोर मांडला.

NCP Minister Meet Sharad Pawar
Vidhan Parishad News : ‘कोर्ट नको, ते सोपं आहे, तुम्हाला’; नीलम गोऱ्हेंच्या सभापतिपदावरून फडणवीस-जयंत पाटील भिडले

या सर्व घडामोडीनंतर रविवारी मात्र, अचानक राष्ट्रावादीत नवा ट्विस्ट समोर आला. राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ राहण्यासाठी विनंती केली. त्यानंतर पवारांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

त्यानंतर सोमवारी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सर्व आमदार आणि मंत्री शरद पवारांच्या भेटीला वाय.बी.चव्हाण सेंटर येथे दाखल झाले आहेत. आता या भेटीनंतर दोन्ही गटात दिलजमाई होणार का? पक्षातून बंडखोरी केलेल्या मंत्र्यांसह आमदारांचं म्हणणं शरद पवार ऐकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

NCP Minister Meet Sharad Pawar
NCP MLAs Meets Sharad Pawar: NCP चे फुटलेले मंत्री, आमदार अजित पवारांसह पुन्हा शरद पवारांकडे ; या भेटीत काय ठरणार ?

दरम्यान, याबरोबरच आमदारांच्या भेटीनंतर शरद पवार काय भूमिका घेणार? राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनंतर आमदारांनी शरद पवारांची भेट नेमकं कोणत्या कारणाने घेतली? या भेटीत आमदारांनी पवारांकडे कोणती मागणी केली? यासह अनेक प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com