Solapur NCP News : अजितदादांच्या सोलापुरातील सहा शिलेदारांना सत्तेची 'पाॅवर'

Ajit Pawar NCP Solapur News : राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजित पवारांच्या पाठिशी उभे राहणाऱ्या सोलापूरमधील सहा नेत्यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांसाठी निमंत्रण...
Solapur NCP News
Solapur NCP News Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News : भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकारमध्ये सामील झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या सोलापुरातील सहा शिलेदारांची जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाच्या ठरणाऱ्या समितीवर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्यासह सहा मातब्बर नेत्यांना संधी देण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची ही खेळी निर्णायक ठरणार आहे. (Latest Marathi News)

Solapur NCP News
NCP Crisis: मोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष काकाचा की पुतण्याचा ? लेखी सबमिशन सादर करण्याचा शेवटचा दिवस

राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, करमाळ्याचे राहुल सुभाष सावंत, मोहोळ तालुक्यातून सज्जन दत्तात्रय पाटील, माढ्याच्या नीता संभाजी ढाणे, माळशिरस तालुक्यातून सुरेश नारायण पालवे पाटील तर बार्शीतून निरंजन प्रकाश भूमकर यांना अजित पवार गटाने नियोजन समितीवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे

अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून फुटून महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील या नेत्यांनी अजित पवार यांची पाठराखण करत त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे बक्षीस या नेत्यांना मिळाल्याचे या निवडीवरून मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सहा नेत्यांना सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांसाठी निमंत्रित करण्यात यावे, असे पत्र उपसचिवांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पाठवले आहे.

Solapur NCP News
Assembly Winter Session : ''...म्हणून अजित पवार इकडे आले'' ; विधिमंडळात एकनाथ शिंदेंचं विधान!

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्रिमंडळ विस्तार रखडला असला तरी जिल्हास्तरावरील नेत्यांना सत्तेची ताकद देण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून होताना दिसून येत आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता स्थानिक कार्यकर्त्यांना बळ मिळावे आणि पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पक्षाकडून ही या निवडी तातडीने करण्यात आल्याचे मानले जात आहे. या सत्तेच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढीसाठी या नेत्यांना आता काम करावे लागणार आहे. तसेच, आगामी निवडणुकीत अजित पवार गटाला सोलापूर जिल्ह्यात रिझल्ट दाखवावा लागणार आहे.

दरम्यान, सोलापूर डीपीसीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नेत्यांनाच संधी देण्यात आली आहे. यामध्ये सोलापूर शहरातील एकाही नेत्याला स्थान देण्यात आलेले नाही, त्यामुळे शहरातील पदाधिकाऱ्यांना सत्तेतील कुठली पदे मिळणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com