Jitendra Awhad : NEET पेपर घोटाळ्यावर आंदोलन पेटलं! महाराष्ट्रातही लढा तीव्र करणार, जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

NEET Paper Leak Protest Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, देशाच्या इतिहासात परिवर्तन घडविण्यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे.
Jitendra Awhad meets student protesters at Jantar Mantar and announces plans to intensify the NEET paper leak agitation across Maharashtra.
Jitendra Awhad meets student protesters at Jantar Mantar and announces plans to intensify the NEET paper leak agitation across Maharashtra.sarkarnama
Published on
Updated on

Jitendra Awhad News : नीट पेपर घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके यांची भेट घेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्रातही व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार आव्हाड यांनी व्यक्त केला.

सोनम वांगचूक आणि अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. 20 जुलै रोजी आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळू लागला असून, आव्हाड यांच्यासह ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, गटनेते अभिजीत पवार, महिला अध्यक्षा मनीषा भगत आणि अन्य नगरसेवकांनी नुकतीच आंदोलनस्थळी उपस्थिती लावली.

यावेळी डॉ. आव्हाड यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, देशाच्या इतिहासात परिवर्तन घडविण्यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे. बिहार आणि गुजरातमधील विद्यार्थी चळवळींनी तत्कालीन सत्तेला मोठे आव्हान दिले होते. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या आंदोलनामुळे देशाच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली. तसेच स्वातंत्र्यलढ्यात शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांसारख्या तरुण क्रांतिकारकांनीही विद्यार्थीदशेतच देशासाठी संघर्ष केला होता.

Jitendra Awhad meets student protesters at Jantar Mantar and announces plans to intensify the NEET paper leak agitation across Maharashtra.
CJP Protest: एकेकाळी मोदी-शहांचा कट्टर समर्थक राहिलेला नेता आला समोर, 'सीजेपी'च्या पेटलेल्या आंदोलनात घेतली उडी,भाजप सरकारला झाप झाप झापलं

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांच्या आंदोलनाची टवाळी करणे हा इतिहासातून काहीही न शिकण्याचा प्रकार आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि महाराष्ट्रातही हा लढा अधिक ताकदीने पुढे नेला जाईल,” असे डॉ. आव्हाड यांनी स्पष्ट केले.

Jitendra Awhad meets student protesters at Jantar Mantar and announces plans to intensify the NEET paper leak agitation across Maharashtra.
Rahul Gandhi protest : राहुल गांधींनी फिरवलं राजकारण! काँगेसच्या मनासारखं घडलं... एक घटना ठरली गेमचेंजर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com