वाझेला झटका; NIA न्यायालयाकडे केलेली मागणी फेटाळली

अँटालिया स्फोटक आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी सचिन वाझेसह नऊ आरोपींना एनआयएकडून अटक करण्यात आली.
Sachin Waze
Sachin Waze
Published on
Updated on

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू (Mansukh Hiren Murder Case) आणि अँटालिया स्फोटक प्रकरणातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याची काही दिवसांपूर्वीच हृदयशस्त्रक्रिया झाली आहे. त्यानंतर त्याने प्रकृतीचे कारण देत पुढील उपचारांसाठी घरीच नजरकैदेत ठेवण्याची मागणी NIA न्यायालयात केली होती. ही मागणी न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे.

अँटालिया स्फोटक आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी सचिन वाझेसह नऊ आरोपींना एनआयएकडून अटक करण्यात आली. त्यांना तळोजा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र, तुरुंगात असताना ह्रदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने वाझेला ता. ३० ऑगस्ट रोजी भिवंडी येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याच्यावर ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, यानंतर मुंबई सेंट्र्ल येथील वोकहार्ट रुग्णालयात वाझेवर ता. १४ सप्टेंबरला ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

Sachin Waze
यूपीएससीत टॉप करताच शुभम कुमार यांची अशीही फसवणूक

या शस्त्रक्रियेनंतर वाझेने पुढील तीन महिने उपचारासाठी आपल्याला घरीच नजरकैदेत ठेवण्याची मागणी न्यायालयात केली होती. याबाबत न्यायालयाकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) याबाबत भूमिका मांडण्यात सांगण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी न्यायालयानं वाझेची मागणी फेटाळून लावली आहे. वाझेला आता तळोजा कारागृह रुग्णालयात हलवले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सचिन वाझेनं लिहिलेल्या पत्रात तीन मंत्री आणि एका बड्या नेत्यावर आरोप केले होते. सीबीआयनं एप्रिलमध्ये त्याच्या चौकशीचा एक भाग म्हणून वाझेची चौकशी केली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझे तळोजा कारागृहात होता.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरू झाली आहे. वाझे यानेही एका कथित पत्रात देशमुख यांच्या नावाचा उल्लेख केल्याचे वृत्त होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com