Nilesh Rane: केसरकरांसाठी आमच्याकडे १ तारखेनंतर नोकरी आहे!

बंडखोर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांना निलेश राणे यांनी उत्तर दिले आहे.
Nilesh Rane & Deepak Kesarkar
Nilesh Rane & Deepak KesarkarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राणे कुटुंब (Nitesh Rane) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak kesarkar) यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. केसरकर यांनी नुकत्याच केलेल्या टिकेनंतर आता त्यात निलेश राणे यांनी ट्वीट करून केसरकरांना चिमटा काढला आहे. (Nilesh Rane & Deepak kesarkar both are from Konkan)

यासंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये निलेश राणे म्हणतात, दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे.

Nilesh Rane & Deepak Kesarkar
Congress: जनप्रबोधनासाठी काँग्रेसची धुळे जिल्ह्यात पदयात्रा

बंडखोर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते सध्या चांगलेच आक्रमक झालेले दिसतात. त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत राणे यांच्यावर टिका केली होती. दोन्ही नेते कोकणातील असल्याने त्यांच्यातील राजकीय वादाला नवी फोडणी मिळाली आहे. श्री. केसरकर यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा उल्लेख आपल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते, असे विधान केले होते.

Nilesh Rane & Deepak Kesarkar
Dhule news: भाजपनंतर आमदार फारूक शाह महापालिका प्रशासनावर बरसले!

त्याच वेळी, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याविषयीही त्यांनी वक्तव्य केले होते. राणे कुटुंबांवर टीका करताना, अभिनेते सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राणे पिता पुत्रांनी आदित्य ठाकरेंची बदनामी केली असे म्हटले होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com