Nitesh Rane : राजकारण पेटलं : राणेंनी आव्हाडांना दिली हिंदू मंदीरांची यादी..

Nitesh Rane : राणे यांनी टि्वट करीत आव्हाडांना पत्र लिहिलं आहे.
 
jitendra Awhad, Nitesh Rane
jitendra Awhad, Nitesh Rane sarkarnama

Nitesh Rane : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक या वादामुळे राज्याचे राजकारण पेटलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब विषयी केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

"औरंगजेब हा काही हिंदूद्वेष्टा नव्हता," असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाचा समाचार भाजपाकडून घेतला जात आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी आव्हाड यांचा हा व्हिडिओ ट्विट करत औरंगजेबाच्या प्रेमाखात आणखी कोणत्या थराला जाणार आहात असा प्रश्न नुकताच विचारला आहे. त्यानंतर आज भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या टार्गेटवर आव्हाड असल्याचे दिसते. राणे यांनी टि्वट करीत आव्हाडांना पत्र लिहिलं आहे. या पत्रासोबत राणेंनी एक यादी जोडली आहे.

 
jitendra Awhad, Nitesh Rane
Narendra Modi : मोदींच्या मंत्रीमंडळात शिंदे गटातील दोघांच्या गळात मंत्रीपदाची माळ पडणार..

"मी आपल्याला या पत्रासोबत औरंग्याने तोडलेल्या हिंदू मंदीरांची यादी देत आहे. मला खात्री आहे, आपण हे तथ्य आपल्या मुघलशाहीच्या आस्थेपोटी स्वीकारणार नाही," अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांना राणेंनी सुनावलं आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपल्या भाषणात छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर ही पदवी देऊ नका ते धर्मवीर नव्हते. त्यांना स्वराज्य रक्षक म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य रयतेसाठी निर्माण केलं त्याचं रक्षण करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं असं विधान केलं.

त्यानंतर अजित पवार त्यांच्या विरोधात आंदोलनंही केली जात आहेत. अशात या वादावर बोलताना औरंगजेब हा क्रूर आणि हिंदूद्वेष्टा नव्हता असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्यावरून आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर प्रचंड टीका केली जाते आहे.

 
jitendra Awhad, Nitesh Rane
Sangli News : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा वाद चिघळला ; आंदोलक ताब्यात

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

“छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्यरक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला कुणी दिली? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले.

त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं. तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो.”

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com