Nitesh Rane : केजरीवाल-ठाकरे भेटीनंतर राणेंचं टि्वट ; म्हणाले, ' खलिस्तानवाद्यांचं समर्थन.."

Nitesh Rane on Uddhav Thackeray : जन्माने संपत्तीत वारसा मिळतो पण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मिळवता येत नाही,
Nitesh Rane News, uddhav thackery Latest News
Nitesh Rane News, uddhav thackery Latest Newssarkarnama
Published on
Updated on

Nitesh Rane on Uddhav Thackeray : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल (शुक्रवारी) मातोश्रीवर ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पंजाबचे आपचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही यावेळी उपस्थित होते.

या भेटीदरम्यान, देशातील अनेक समस्यांवर चर्चा केल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. केजरीवाल यांनी यावेळी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरुन भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंना डिवचलं आहे. राणेंनी टि्वट करुन ठाकरेंवर जोरदार हल्ला केला आहे. "आधी मुंबई बॅाम्ब स्फोटातील आरोपींचे समर्थन करणाऱ्यांसोबत मुख्यमंत्री झाले.आता खलिस्तानवाद्यांचं समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांला भेटतात.यावरून हेच सिद्ध होते जन्माने संपत्तीत वारसा मिळतो पण आमचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मिळवता येत नाही," असे टि्वट नितेश राणे यांनी केले आहे.

Nitesh Rane News, uddhav thackery Latest News
CM Maharashtra : मुख्यमंत्रिपदासाठी नशीबही लागतं का ?

काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मातोश्री येथे उद्धव ठाकरेंसह अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत भेटीमागचे कारण स्पष्ट केले. अरविंद केजरीवाल म्हणाले, “आजच्या भेटीमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली. देशातील समस्यांवर चर्चा केली. देशातील युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. शिक्षण घेऊनही अनेकांना नोकरी मिळत नाही. या युवकांना मोठ-मोठी आश्वासनं दिली होती,"

Nitesh Rane News, uddhav thackery Latest News
Ajit Pawar : मध्यावधी निवडणुकाबाबत अजितदादा म्हणाले, "लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र.."

"2 ते 4 कोटी नोकऱ्या उपलब्ध करण्याची आश्वासने देण्यात आली होती. पण अजूनही नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. इतकी महागाई वाढली आहे की, लोकांना घरचा खर्च भागवता येत नाही. एकीकडे लोकांचा पगार वाढत नाहीये तर, दुसरीकडे त्यांचा खर्चात मात्र मोठी वाढ होत आहे”, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.

"उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची चोरी झाली. त्यांचे चिन्ह आणि नाव चोरी करण्यात आले. उद्धव ठाकरे यांचे वडील वाघ होते. हे वाघाचे पूत्र आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा मोठा विजय होणार आहे,” असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com