Nitesh Rane On Amit Thackeray : नितेश राणेंनी घेतली अमित ठाकरेंची शाळा; म्हणाले, " हे त्यांचे ट्रेनिंग..."

Amit Thackeray On Irshalwadi : 'शिवतीर्थ' अन् भाजपमध्ये कलीगीतुरा रंगण्याची शक्यता
Amit Thackeray, Nitesh Rane
Amit Thackeray, Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : फोडाफोडीच्या राजकारणाला हात घालून भाजपच्या धोरणांवर घसरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरेंच्या सनसनाटी आरोपामुळे भाजप नेत्यांचे पित्त खवळणार आहे. अशात भाजप आणि आपल्या नेत्यांना बोलणाऱ्यांचा सडतोड भाषेत उत्तर देणाऱ्या आमदार नितेश राणेंनी अमित यांना मोजक्याच शब्दांत धुडकावले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंचा रोज पाणउतारा करणाऱ्या नितेश हे आता आपला बाण 'शिवतीर्थ' (म्हणजे, राज ठाकरे यांचे निवासस्थान) रोखल्याचे दिसत आहे. त्यावरून राणे-राज यांच्यातही राजकारण पेटू शकते. (Latest Political News)

Amit Thackeray, Nitesh Rane
Raj & Amit Thackeray News : 'शिवतीर्थ'च्या मनात नक्की काय ? राज ठाकरेंपाठोपाठ अमितही भाजपवर तुटून पडले

इर्शाळवाडीतील घटनेवर बोलताना अमित यांनी सत्तासंघर्षाचा संदर्भ जोडला. तेवढ्यावरच न थांबता, आमदार फोडाफोडून वेळ मिळाल्यानंतर सरकारला अशा घटना रोखता येतील असे बोचरी टिपण्णी केली. त्यातून भाजप आणि मोदी-शाह-फडणवीसांवरच अमित यांचा रोख असल्याचे दिसूनही आले. त्यांच्या या विधानावर भाजप वर्तुळातून लगोलग प्रतिक्रियाही उमटू लागल्या. त्यात भाजप नेत्यांवरील हल्ले परतवण्यासाठी फ्रंटवर असणारे नितेश पुढे आले. नितेश यांनी आपल्या नेहमीच्या शब्दात पण मिश्किलपणे अमित यांचा समाचार घेतला. त्यावर आता मनसेचे इतर नेतेही तुटून पडण्याची शक्यता आहे. यातून पुढील काही दिवस भाजप-मनसेच्या नेत्यांमध्ये जुंपणार हे निश्चित आहे.

Amit Thackeray, Nitesh Rane
Gulabrao Patil In Session : "शेतकऱ्याचा पोट्ट्या हाय..."; गुलाबराव पाटलांनी दंड थोपटतच आदित्य ठाकरेंना सुनावले

काय म्हणाले नितेश राणे ?

अमित यांच्यावर बोलताना नितेश म्हणाले, "अमित ठाकरे तरुण आहेत, राजकारणात नवीन आहेत. ते सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्यांचे ट्रेनिंग सुरू आहे. हे त्यांचे ट्रेनिंगचे वर्ष असल्याने त्यांना थोडी संधी दिली पाहिजे. त्यांनी सरकारव टीका केली हे ठीक आहे. आता सरकार म्हणून त्यांना उत्तर देऊ. मात्र ते आता शिकत आहेत. राज्यात फिरत आहेत. याबाबत आमची असलेली भूमिका त्यांना समजावून सांगू."

अमित ठाकरे म्हणाले..

अमित ठाकरे जळगावच्या दौऱ्यावर असताना इर्शाळवाडीच्या घटनेवरून सरकारवर टीका केली. अमित म्हणाले, इर्शाळवाडीसारख्या घटनांबाबत राज ठाकरेंनी सरकारला आधीच सूचित करून उपाययोजना करण्यास सांगितले होते. सरकार मात्र आमदार फोडण्यात व्यस्त होते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी ही दुर्घटना घडली व लोकांना जीव गमवावे लागले. त्यामुळे घटनेला काहीअंशी सरकार जबाबदार आहे."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com