Raj & Amit Thackeray News : 'शिवतीर्थ'च्या मनात नक्की काय ? राज ठाकरेंपाठोपाठ अमितही भाजपवर तुटून पडले

MNS Vs BJP : ''...त्यामुळे ही मोठी दुर्घटना घटना घडली!''
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

दीपक कुलकर्णी -

Pune : मोदी - शहांच्या जोडगोळीपासून भाजपच्या राजकीय‘नीती’वर न बोलणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरेंचा ‘मूड’ बदल्याचे दिसत आहे. नव्या ‘मूड’मध्ये राज भाजपला सल्लेच नव्हे; तर थेट खडेबोलही सुनावू लागले आहेत. मणिपूरमधील घटनेवरून तर राज यांनी मोदी सरकारला धारदार शब्दांनीच सोलून काढले. त्यापाठोपाठ अमित ठाकरेंनी आमदार फोडाफोडीचा मुद्दा उकरून काढला आणि पडद्याआडून का होईना पण भाजपच्या तेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित राज ठाकरे(Amit Thackeray) यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार निशाणा साधला. अमित यांनी पहिल्यांदाच त्यातही भाजपच्या जिव्हारी लागण्याच्या हेतुने आमदारांचा मुद्दा मांडल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. त्यापलीकडे, राज ठाकरे(Raj Thackeray) आणि अमित ठाकरेंनी आता खरोखरीच आपला राजकीय ‘अजेंडा’ही बदलला का, यावरच्या चर्चेला जागा करून दिली आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray On Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेवर राज ठाकरे भडकले, म्हणाले, ''....हे कसलं प्रशासन ?

इर्शाळवाडीतील घटनेवर ठाकरे काय म्हणाले..?

अमित ठाकरे यांनी जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रायगडमधील इर्शाळवाडीतील घटनेवर भाष्य केलं. ठाकरे म्हणाले, इर्शाळवाडीच्या घटनेबाबत राज ठाकरेंनी या आधीच सूचित केले होते. यासंदर्भात सरकारला उपाययोजना करण्यासही त्यांनी सांगितले होते. मात्र, सरकार आमदार फोडण्यात व्यस्त असल्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही मोठी दुर्घटना घटना घडली व लोकांना आपले जीव गमवावे लागले, असा आरोप करत अमित ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.

...तर ही घटना घडलीच नसती !''

इर्शाळवाडीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र, या घटनेला काहीअंशी सरकार जबाबदार आहे. राज ठाकरे यांनी या दुर्घटनेबाबत सरकारला अगोदर सूचित केले होते. त्यांनी सरकारला उपाययोजना करण्याबाबत सांगितले होते. पण हे सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. जर वेळीच लक्ष देवून उपाययोजना केली असती तर ही घटना घडलीच नसती", असं म्हणत त्यांनी राज्य सरकारलाच या घटनेबाबत जबाबदार ठरवलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com