No Bomb In Mantralaya : मंत्रालयात बॉम्ब नाही, पोलिसांची खात्री; कर्मचाऱ्यांनी घाबरून न जाण्याचे केले आवाहन !

Mumbai Police : पोलिसांनी डॉग स्कॉड आणि बॉम्ब शोध पथकाला तात्काळ पाचारण केले.
Mantralaya, Mumbai.
Mantralaya, Mumbai.Sarkarnama

Mumbai Mantralaya Bomb News : मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणार फोन मंत्रालयात करण्यात आला. त्यानंतर मंत्रालय परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी डॉग स्कॉड आणि बॉम्ब शोध पथकाला तात्काळ पाचारण केले. पोलिसांनी संपूर्ण परिसर तपासल्यानंतर बॉम्ब नसल्याची खात्री केली. (A dog squad and a bomb squad were called immediately)

सद्यःस्थितीत मंत्रालयात कुठेही बॉम्ब नाही. तरीही पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावलेला आहे. परिसरात वावरणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात आहे. मंत्रालयात येणाऱ्या गाड्यांचीही कसून तपासणी केली जात आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव बाळकृष्ण ढाकणे, असे असून तो अहमदनगरचा असल्याची माहिती आहे. पोलिस त्याच्या मागावर आहेत. त्याला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा पूर्ण उलगडा होणार आहे. बाळकृष्ण ठाकणे याने मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली होती. गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा हा प्रकार घडला. ही बाब मंत्रालयात माहिती होताच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ढाकणे याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बोलणे करून देण्याची मागणी केली होती, अशी माहिती आहे. जर बोलणे करून दिले नाही, तर आधीच मंत्रालयात (Mantralaya) ठेवलेल्या बॉम्बने मंत्रालय उडवून देऊ, असेही ढाकणे याने म्हटले होते. पोलिसांनी (Police) लगेच हालचाल करीत संपूर्ण मंत्रालय पिंजून काढले आणि अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना दिलासा दिला.

Mantralaya, Mumbai.
Farmer Protest In Mantralaya: अप्पर वर्धा प्रकल्प बाधितांना मुख्यमंत्र्यांचे मोठे आश्वासन; पंधरा दिवसांतच मार्गी लावणार प्रश्न

मंत्रालयात चाकू नेणाऱ्या तरुणाला पकडले..

हा प्रकार घडला असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. नवीन प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षा द्वारावर तपासणी दरम्यान बॅग स्कॅनरमध्ये स्कॅनिंग सुरू असताना एका बॅगमध्ये धारदार चाकू आढळला. ती बॅग एका तरुणाची होती. बॅगमध्ये टाकून हा युवक चाकू घेऊन मंत्रालयात जाण्याच्या प्रयत्नात होता.

पोलिसांनी सावध होत, लगेच त्या तरुणाला ताब्यात घेतले. विचारपूस केली असता, तो उमरगा येथून आला असल्याची माहिती मिळाली. त्याने चाकू कशासाठी बाळगला होता आणि मंत्रालयात कशासाठी घेऊन चालला होता, याबाबत माहिती मिळू शकली नाही. पण पोलिस त्या तरुणाची कसून चौकशी करत आहेत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com