Farmer Protest In Mantralaya: अप्पर वर्धा प्रकल्प बाधितांना मुख्यमंत्र्यांचे मोठे आश्वासन; पंधरा दिवसांतच मार्गी लावणार प्रश्न

Cm Eknath Shinde On Upper Wardha Dam Affected: अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उड्या मारत आंदोलन केले.
Cm Eknath Shinde
Cm Eknath ShindeSarkarnama

Mumbai News: अमरावतीमधील अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी थेट मंत्रालयात आंदोलन करत मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उड्या मारल्या. मात्र, पोलिसांनी तातडीने या शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने या शेतकऱ्यांबरोबर बैठक घेत त्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली.

या चर्चा दरम्यान अप्पर वर्धा प्रकल्प बाधितांच्या मागण्यांबद्दल येत्या पंधरा दिवसात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. अप्पर वर्धा प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसन आणि त्यांच्या मागण्यांसंदर्भात पुढील पंधरा दिवसांत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.

Cm Eknath Shinde
Mahadev Jankar News : 'रासप'च्या महादेव जानकरांनी लोकसभेचा मतदारसंघ ठरवला; 'या' ठिकाणाहून निवडणूक लढविणार !

या बाधित गावातील जमीन, पुनर्वसनाचे पर्याय याबाबत सर्व आढावा घेऊन माहिती तयार करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्यातील 42 गावे बाधित झाली आहेत.

या सर्व बांधितांना जमिनीच्या बदल्यात जमीन, धरणग्रस्तांसाठी प्रतिक्षा यादी तसेच ज्यांना नोकरी शक्य नाही, त्यांना नुकसान भरपाई, अशा विविध पर्यायाबद्दल मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. यानंतर यावर ठोस तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Cm Eknath Shinde
Sharad Pawar On Bhujabal : तेव्हा राजीनामा घेतला नसता तर भुजबळ तुरुंगात गेले असते; शरद पवारांचं मोठं विधान

या शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत माहिती एकत्र करण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी लगेचच वर्धाच्या जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच प्रकल्पग्रस्तांशी जलसंपदा विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागाने समन्वय साधत उपाययोजना करत यावर तोडगा काढण्याचे पर्याय तयार ठेवावेत, अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com