हिजाब नाही मग बिकिनी घालायची का?; मला हिजाबवाली महिला PM म्हणून बघायचीय...

Asaduddin Ovesi : इराणी चहा पितो इतकाच आमचा त्यांच्याशी संबध...
Asaduddin Ovesi MIM Latest News
Asaduddin Ovesi MIM Latest NewsSarkarnama

Asaduddin Owaisi : कर्नाटकातील शालेय संस्थांमध्ये हिजाबबंदीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयांच्या (Supreme Court) न्यायाधिशांमध्ये एकमत न झाल्याने आता या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंडपीठाकडून केली जाणार आहे. मात्र याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले असून एमआयचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Ovesi) यांनी हिजाबला विरोध करणाऱ्यांवर टीका केली आहे. (Asaduddin Ovesi MIM Latest News)

Asaduddin Ovesi MIM Latest News
अंधेरी पोटनिवडणुक जिंकण्यासाठी आम्ही कशी तयारी करणार हे समोरच्यांना दिसेलच...

ओवेसी म्हणाले, मी जेव्हा म्हणतो की, एक दिवस हिजाब परिधान करणारी महिला या देशाची पंतप्रधान व्हावी हे माझं स्वप्न आहे. तेव्हा ते अनेकांना खटकत तर अनेकांच्या डोक्यात आणि पोटात दुखायला लागते. मात्र मी असे का म्हणू नये? हे माझे स्वप्न असून यात चूक काय आहे. आपण म्हणता, की हिजाब परिधान करू नये, मग काय बिकनी घालायची का? आपल्याकडे तीही घालण्याचा अधिकार आहे. त्याला माझा विरोधही नाही. मात्र मुलीने हिजाब परिधान करू नये आणि मी दाढी काढावी, अशी आपली इच्छा का आहे?, असा थेट सवाल ओवेसींनी केला आहे.

Asaduddin Ovesi MIM Latest News
एकनाथ शिंदे सरकारने दिलेले ९४० रुपये शेतकरी परत करणार!

सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी काय परिधान करावे हा पंसतीचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. आम्हाला सविधानाने हा अधिकार दिला आहे. आम्ही त्यानुसार वागू बाकी कुणाच्या इशाऱ्यावर चालणार नाही. मुस्लीम मुलीने हिजाब घातला तर तिची बुद्धीमत्ता कमी आहे, असा समज अनेकदा करण्यात येतो.

आम्ही आमच्या लहान मुलींना हिजाब घालण्याचा दबाव टाकतो का? आम्ही खरंच मुलींना बळजबरी करतो का? आमच्यावर आरोप केला जातो की, आम्ही मुलींवर दबाव टाकतो. आजकाल कोण कुणाला घाबरतो का? आमच्या मुली या आपल्या मनाने हिजाब घालतात आणि त्या यापुढेही घालत राहतील. तुम्हाला जे घालायचे ते घाला, अशा शब्दात त्यांनी भाजप नेत्यांना सुनावले.

काही झालं की इराणमध्ये काय होत ते आम्हाला सांगितलं जात मात्र त्याशी आम्हाला काही घेणे देण नाही. फक्त हैदराबादमध्ये फक्त इराणी चहाच पितो बाकी आमचा त्यांच्याशी काही संबध नाही,अशा शब्दात त्यांनी भाजप नेत्यांची खिल्ली उडवली.

Asaduddin Ovesi MIM Latest News
कृष्णप्रकाश यांच्यामुळे टळली उद्योजकाची आत्महत्या; पोलिसांचा तपास सरू

दरम्यान, देशातील हिंदू, शिख आणि ख्रिश्चन विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रतिकांसह शाळेत प्रवेश दिला जातो, तर मग मुस्लिमांनाच का रोखले जाते. असे होते तेव्हा लोक मुस्लीम समाजाच्या बाबतीत काय विचार करत असतील. काय मेसेज जात असेल? मुस्लीम आपल्या पेक्षा खालच्या पातळीचे आहेत. यामुळे या गोष्टी बदलल्या पाहिजे यानंतरच सर्व धर्माचे नागरिक एकदिलाने देशासाठी कार्य करतील आणि देशाची प्रगती होईल, असेही ओवेसींनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com