अंधेरी पोटनिवडणुक जिंकण्यासाठी आम्ही कशी तयारी करणार हे समोरच्यांना दिसेलच...

Uday Samant : भाजप- बाळासाहेबांची शिवसेना युतीचा उमेदवारच जिंकणार
Uday Samant Latest News
Uday Samant Latest News Sarkarnama

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर आता अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात थेट लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही बाजूने तयारी सुरू करण्यात आली असून विजयाचा दावा करण्यात येत आहे. (Uday Samant Latest News )

Uday Samant Latest News
शिवसेनेच्या ठाकरे गटाकडूव ऋतुजा लटकेंचा उमेदवारी अर्ज दाखल

दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली असून या निवडणुकीत भाजप युतीचा उमेदवारच विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही गटांकडून गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच तोंडावर आलेल्या या अंधेरी पोटनिवडणुकीत भाजप आणि दोन्ही शिवसेनेत जोरदार शाब्दिक युद्ध रंगतांना दिसत आहे. यामुळे या निवडणुकीत आमचाच उमेदवार विजयी होणार, असा दावा करण्यात येत आहे.

Uday Samant Latest News
रमेश लटकेंना मानसिक त्रास दिला, त्यांचे फोन मातोश्रीवर उचलत नव्हते : राणेंचा गंभीर आरोप!

सामंत म्हणाले की, अंधेरीची पोटनिवडणुकीत आम्ही कशापद्धतीने तयारी केली किंवा आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कशी पद्धतीने जोर लावला जाईल. हे समोरच्याला कळेलच. यामुळे या निवडणुकीत आमचाच उमेदवार निवडून येणार, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, कोकणाबाबत बोलतांना ते म्हणाले की, कोकणात कितीही गट झाले तरी कोकण पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आणि आजही आणि भविष्यात देखील तो बाळासाहेबांच्या शिवसेनेचाच बालेकिल्ला राहणार असल्याचे सामंतांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com