आता मोदींना कुठली शिक्षा द्यावी ; नवाब मलिकांचा प्रश्न

8 नोव्हेंबर 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रात्री आठ वाजता जनतेला संबोधित करताना जाहीर केलं की दुसऱ्या दिवशीपासून तेव्हा अस्तित्वात असणाऱ्या 500 आणि 1000च्या नोटा (demonetisation) चलनातून रद्द झाल्या.
PM Narendra Modi
PM Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

मुंबई : पाच वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) ५०० व १ हजारांच्या नोटा चलनातून रद्द (demonetisation) केल्या होत्या. या पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे भष्ट्राचार, दहशतवाद संपेल, असे ठामपणे मोदींनी त्यावेळी सांगितलं होतं. मोदींच्या या निर्णयामुळे सामान्यांना त्यांचा सर्वात जास्त फटका बसला. भष्ट्राचार, दहशतवाद संपला नाही, यावरुन राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मोदींना प्रश्न विचारला आहे. याबाबत मलिकांनी खोचक टि्वट केलं आहे.

8 नोव्हेंबर 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रात्री आठ वाजता जनतेला संबोधित करताना जाहीर केलं की दुसऱ्या दिवशीपासून तेव्हा अस्तित्वात असणाऱ्या 500 आणि 1000च्या नोटा (demonetisation) चलनातून रद्द झाल्या. याबाबत टि्वट करताना नवाब मलिक म्हणतात की आज नोटबंदीला पाच वर्ष पूर्ण झाली. मोदी म्हणाले होते, 'भ्रष्टाचार, दहशतवाद संपेल,' तो संपला का ? मोदी म्हणाले, 'नाही संपला, तर मला चौकात मला शिक्षा दया,'' आता कुठली शिक्षा मोदींना द्यावी.

PM Narendra Modi
सुनील पाटलांचा मोठा गैाप्यस्फोट ; 'भानुशालींनी मला मारहाण केली'

पाच वर्षापूर्वी मोदींनी नोटाबंदीचा हा निर्णय घेऊन अनेकांना धक्का दिला होता. देशात पहिल्यांदाच या नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. यामागील तीन कारणे मोदींनी सांगितलं होते. २०१४च्या निवडणुकीच्या वेळी मोदींनी मोठे आश्वासन दिले होते. त्यामुळे ते विजयी झाले होते. त्यांनी प्रचाराच्या भाषणात अनेकवेळा काळा पैसा, भष्ट्राचार, दहशतवादाच्या विरोधात मोठ्या घोषणा केल्या होत्या.

मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या सरकारनं अनेक मोठे निर्णय घेतले. यात नोटाबंदी हा महत्वाचा निर्णय आहे. यामागे रोख व्यवहार टाळून आँनलाईन व्यवहार करण्यावर भर देण्यात आला होता. पण एका अभ्यासानुसार, नोटाबंदीनंतर पाच वर्षात रोख व्यवहार वाढच होत आहे. गेल्या पाच वर्षाच रोख रक्कम वाढत आहे, एका अभ्यासानुसार ४ नोव्हेंबर २०१६ रोजी नागरिकांकडे १७.९७ लाख कोटी रोख रक्कम होती, आज त्यात ५७.४८ टक्के वाढ होऊन १०.३३ लाख कोटी रुपयांमध्ये वाढ होऊन २८.३० लाख कोटी इतकी झाली आहे. म्हणजे पाच वर्षात रोकड कमी न होता, यात वाढ झाली आहे.

NCBच्या चैाकशीला आर्यन गैरहजर समीर खान यांचा पण जबाब नोंदविणार

मुंबई : मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात शनिवारी दिल्लीहून एनसीबीचे विशेष पथक मुंबईत पोहचले आहे. एनसीबीच्या (NCB) एसआयटीने (SIT) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (aryan khan)याला रविवारी समन्स बजावले होते. पण आर्यन यावेळी उपस्थित राहू शकला नाही. त्याला ताप असल्यामुळे तो एनसीबीच्या चैाकशीला उपस्थित राहू शकला नसल्याचे समजते. आर्यन सोमवारी उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com