मॅाडीफाय दुचाकीवरुन हवा करणाऱ्या युवकांची पोलिसांनी काढली 'हवा'

मॅाडीफाय सायलेन्सर ताब्यात घेतले होते. त्यांच्या गाडीचे काढून टाकलेल्या सायलेन्सरचा पुनर्वापर होऊ नये म्हणून ते भोंगे एका रोडरोलरखाली चिरडून नष्ट करण्यात आले.
मॅाडीफाय दुचाकीवरुन हवा करणाऱ्या युवकांची पोलिसांनी काढली 'हवा'
sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : दुचाकी मॅाडीफाय करुन फिरणाऱ्या अतिउत्साही युवकांवर पोलिसांनी (police) कारवाईचा बडगा उगारला आहे. दुचाकीला मॉडीफायर सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज करत फिरणारे दुचाकीस्वार आपण अनेकदा पाहत असतो.

हॉस्पिटल्स, शाळा, महाविद्यालये तसेच इतर शांत व सार्वजनिक ठिकाणी या सायलेन्सरमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असते. अशा दुचाकीस्वारांना वांद्रे वाहतूक विभागाने ही कारवाई केली. या सायलेन्सरमुळे अनेकांना विनाकारण त्रासही होत होता.

पोलिसांनी दुचाकींना कर्कश मॉडीफाय केलेले सायलेन्सर (modified silencers)लावून फिरणाऱ्या वाहनांवर १९८ मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करत, हे मॅाडीफाय सायलेन्सर ताब्यात घेतले होते. त्यांच्या गाडीचे काढून टाकलेल्या सायलेन्सरचा पुनर्वापर होऊ नये म्हणून ते भोंगे एका रोडरोलरखाली चिरडून नष्ट करण्यात आले.

ही कारवाई मध्ये वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दुचाकीहून वरून हवा करत फिरणाऱ्या अशाच अतिउत्साही युवकांची 'हवा' काढण्याची कारवाई मुंबई पोलिसांच्या वांद्रे वाहतूक विभागाने केली आहे.

बऱ्याच गाड्यांना असणारे सायलेन्सर एखाद्या फटाक्यासारखा आवाज करतात ज्याचा सर्वसामान्यांना बऱ्याचदा त्रास होत असतो. मात्र आता अश्याच कर्णकर्कश आवाज करणाऱ्या व ध्वनी प्रदूषण करणाऱ्या गाड्यांवर शुक्रवारी पोलिसांनी कारवाई केली. अश्या कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले वृद्ध नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत असल्याने यापुढेही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर अशीच कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com