राणेंच्या अडचणी संपेना; पुन्हा एकदा नोटीस

शिवसेना (shivsena) आणि नारायण राणे यांच्यातील वाद संपेना.
Narayan Rane news
Narayan Rane newssarkarnama

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी संपताना दिसत नाहीत. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सॅलियन आणि तिच्या कुटुंबीयांची बदनामी केल्याप्रकरणी नारायण राणे (Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची शनिवारी मालवणी पोलिसांनी (Police) तब्बल ९ तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे.

राणे यांच्या मुंबईतील अदीश बंगला अडचणीत सापडला आहे. पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) अधिकाऱ्यांनी राणेंच्या आदीश बंगल्याची पाहणी केली होती. या पाहणीमध्ये राणे यांनी बंगल्यामध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले होते. या संदर्भात राणे यांना मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत कलम 351, 352, 352A आणि 354A खाली नोटीस बजावली आहे.

Narayan Rane news
राज्यपाल म्हणाले; मुरली इधर आओ, प्रधानमंत्री बुला रहे है !

आदिश बंगल्यातील बेकायदा कामा बद्दल पालिकेने नोटीस पाठवली आहे. बंगल्यातील प्रत्येक मजल्यावर बेकायदा बदल करण्यात आल्याचे नोटीशीत नमुद करण्यात आले आहे. आठ पैकी सात मजल्यावर पालिकेला बेकायदा बांधकाम आढळले आहे. पाहणीत महानगर पालिकेने मंजूर केलेल्या आराखड्याची तुलना करुन इमारतीत बेकायदा बदल झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. हे बेकायदा बांधकाम आपण का काढणार नाही याचे उत्तर ७ दिवसात द्यावे, अशा आशयची ही नोटीस आहे. 18 फेब्रुवारी रोजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी राणेंच्या बंगल्याची पाहणी केली होती.

Narayan Rane news
अमित शहांच्या फोननंतर पोलिसांनी राणेंना सोडले!

पालिकेच्या नोटीसीनुसार केलेले बदल

तळघर सर्विस एरिया, पार्किग एरियात बांधकाम करुन खोल्या तयार केल्या.

पहिला ते तीसरा मजला गार्डनमध्ये खोली तयार करण्यात आली.

चौथा मजला : गच्चीवर खोलीचे बांधकाम

पाचवा मजला : गार्डन टेरेस मध्ये खोली बांधली.

सहावा मजला : पार्ट टेरेस मध्ये खोलीचे बांधकाम

आठवा मजला : पॉकेट टेरेस आणि गार्डन टेरेसमध्ये बांधकाम

गच्ची : पॅसेज एरिया मध्ये बांधकाम केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com