पुणे : कर्वे रस्त्यावरील गरवारे मेट्रो स्टेशनवर हिरवा झेंडा दाखवून तसेच कोनशिलेचे आवरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचे उदघाटन केले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) काहीसे दूर होते हे पाहून पतंप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांना हाक मारली. मात्र. त्यांना ती ऐकू आली नाही हे लक्षात येताच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांनी आपल्या खास शैलीत मोहोळ यांना हाक मारली ते म्हणाले, ‘मुरली इधर आओ, प्रधानमंत्री बुला रहे है !
पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर पंतप्रधान मोदी कर्वे रस्त्यावरील मेट्रोच्या गरवारे मेट्रो स्टेशनवर पोचले.तिथे त्यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण झाले. त्यानंतर मेट्रोला हिरवा झेंडा दाखवताना महापौर पंतप्रधान मोदी यांच्यापासून काहीसे दूर होते.पंतप्रधान मोदी यांनी मारलेली हाक महापौर मोहोळ यांना ऐकू आली नाही.हे लक्षात येताच राज्यपाल कोश्यारी यांनी महापौर मोहोळ यांना हाक मारली. ते म्हणाले, ‘‘ मुरली इधर आओ, प्रधानमंत्री बुला रहे है’’ त्यानंतर तत्काळ मोहोळ पंतप्रधानांच्या शेजारी आले.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते स्टेशनवर कोनशिलिचे अनावरण झाले. यावेळी एका बाजूला पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे होत्या. महापौर मोहोळ काहीसे दूर होते हे पाहताच मोहोळ यांना हाक मारत पंतप्रधानांनी आपल्या शेजारी उभे केले .पुणे महापालिकेच्या अवारात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाला सर्व नगरसेवक उपस्थित होते.या सर्वांना पंतप्रधान मोदी यांना भेटण्याची इच्छा होती.‘‘ पार्षद आपक मिलना चाहते है’’ ! अशी विनंती महापौर मोहोळ यांनी पंतप्रधानांना केली. त्यावर आवश्य मिलेंगे, असे म्हणत सारा ‘प्रोटोकॉल’ बाजूला सारून पंतप्रधान मोदी थेट नगरसेवकांच्या दिशेने गेले. सर्वांना नमस्कार केला. यावेळी काहीजणांनी त्यांच्यासोबत सेल्फीदेखील काढल्या.
महापालिकेतील कार्यक्रम,मेट्रोच्या उदघाटनानादरम्यान महापौरांना दिलेला प्रतिसाद असो व भाषणात त्यांचा केलेला विशेष उल्लेख या साऱ्यातून पंतप्रधान मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यात महापौर मुरलीधर मोहोळ यांना एक सुवर्णसंधी मिळाली. याची चर्चा महापालिकेच्या राजकीय वर्तुळात रंगली.अशी संधी यापूर्वीच्या खूप कमी महापौरांना मिळाली हा साऱ्या चर्चेचा रोख आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.