Koli Samaj Reservation : मराठा, ओबीसी, धनगर यानंतर आता आरक्षणासाठी कोळी समाज आक्रमक; मंत्र्यांची अडवली वाट...

Koli Samaj Demand Reservation Protest against Government : 'कोळी समाजाची मागणी सरकारची डोकेदुखी वाढवणारी...'
Koli Samaj Reservation :
Koli Samaj Reservation :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात दौऱ्यांचा धडाका सुरू ठेवला आहे. मराठा आरक्षण हे ओबीसी प्रवर्गातून मिळावं, अशी मागणी करण्यात येत आहे, तर मराठ्यांचा ओबीसीतल्या समावेशाला ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. मराठा-ओबीसी नेते असा संघर्ष सुरू असतानाच धनगर आरक्षणाचीही मागणी होत आहे, तर आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोळी समाजही आक्रमक झाला आहे. यामुळे आता आरक्षणाची मागणी वाढता वाढता वाढे... अशी स्थिती असल्यामुळे सरकारसमोरील अडचणींचा पाढा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. (Latest Marathi News)

Koli Samaj Reservation :
Maharashtra Politics : कोळी समाजालाही हवा आहे सरसकट जातीचा दाखला!

कोळी समाजाने आपला समावेश आदिवासी समाजात करावा, अशी आग्रही मागणी केली आहे. कोळी समाजाचं आदिवासी समाजात समावेश करून त्यानुसार आरक्षण बहाल करण्याचं आणि तसेच जात प्रमाणपत्र देण्याबाबतचे आश्वासन निवडणूक काळात दिले होते, असे असल्याचे कोळी समाजाने म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकार दिलेला शब्द पाळत नाही. कोळी समाजाच्या मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही सरकारकडून कसलीही दाद दिली जात नाही, दखल घेतली जात नाही, यामुळे कोळी समाज आता सरकारविरोधात आक्रमक झाला आहे. राज्यातील कोळी समाजाने आरक्षणाचा मागणीसाठी तीव्र आंदोलन सुरू केले.

Koli Samaj Reservation :
Nana Patole News : कोळी समाजाच्या आरक्षणासाठी विधिमंडळातही आवाज उठविणार : पटोलेंचे आश्वासन

अशातच राजधानी मुंबईतील आझाद मैदान येथे काही कोळी बांधवांनी सीएसएमटी स्थानकावर धडक दिली. या वेळी कोळी बांधवांनी राज्याचे आदिवासी विकासमंत्री व भाजप नेते विजयकुमार गावित दिसले. या वेळी त्यांनी मंत्री महोदयांचा रस्ता अडवून आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली. या वेळी योग्य ती चाचपणी करून याबाबत सरकार निर्णय घेईल, असे गावितांनी आंदोलकांना म्हटले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com